नाशिक । प्रतिनिधी
फडवणीस सरकारच्या (Devendra Fadanvis) काळात कधीच भारनियमन (Load Shedding) झाले नाही, कधीच वीज कनेक्शन (Light connection) तोडण्यात आले नाही. केंद्र सरकारकडून (Central Government) महाराष्ट्राला आज देखील सर्वात जास्त कोळसा देण्यात येतो आहे. मात्र सध्याच्या वीज टंचाईला (Power shortage) सर्वस्वी राज्य सरकार (State Goverment) जबाबदार असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Opposition Leader Pravin Darekar) यांनी केली आहे.
प्रवीण दरेकर हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात अघोषित भारनियमन (Unannounced Load Shedding) सुरू आहे. सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे आज राज्यावर विजसंकट आले असून ऊर्जा खात्यात बेशिस्त कारभार सुरू आहे. त्यामुळे राज्यातील वीज टंचाईला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने वीज बिल वसुलीच्या सक्ती विरोधात राज्यभर आंदोलन (BJP Agitation) करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील सर्व एमएससीबी कार्यालयावर (Maharashtra MSCB) आंदोलन करण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले कि फडवणीस सरकारच्या काळात कधीच भारनियमन झाले नाही, कधीच वीज कनेक्शन तोडण्यात आले नाही. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आज देखील सर्वात जास्त कोळसा देण्यात येतो. तरी देखील राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारवर आरोप करण्यात येत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
तसेच दरेकर यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले. म्हणाले, राज ठाकरेंच्या भूमिकेला भाजपचं समर्थन असून जिथे गरज पडेल, तिथे भाजपही सहभागी होईल, अशी भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केले.