टीम पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचरने रामशेजवर शोधला नवा मार्ग

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील तीन पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचर ऐतिहासिक रामशेज किल्ल्यावर जाण्यासाठी पश्चिम दिशेला आणखी एक मार्ग शोधला आहे. रामशेज वर जाण्यासाठी आशेवाडी या गावातून पारंपारिक मार्ग आहे. तसेच गावाच्या उत्तरेला दुसरा मार्ग आहे, परंतु या व्यतिरिक्त ही आणखी एक मार्ग पश्चिमेला असल्याचे दुर्ग संवर्धकांनी सांगितले.

रामशेज गडावर घेऊन जाणारा ऐतिहासिक तिसरा पायरी मार्ग असल्याचे काही खाणाखुणा मार्च महिन्यातील रामशेज गडाच्या आडवाटेच्या भटकंतीमध्ये टीम पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचर गिर्यारोहक जॅकी साळुंके, हेमंत पाटील यांच्या निदर्शनास आल्या. हा मार्ग बरीच वर्ष दुर्गप्रेमी पासून अपरिचित होता.

हा ऐतिहासिक ठेवा दुर्गप्रेमींचा समोर यावा, तसेच या मार्गातील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे या उद्दिष्टाने टीम पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचर नाशिक या गिर्यारोहक टीमने या मार्गाची मोहीम हाती घेऊन हा मार्ग सुरक्षित रित्या चढत दुर्ग रामशेज गडाचा माथा गाठला. या मार्गावर जात असताना काही कोरीव पायऱ्या दिसल्या. तशीच काही उध्वस्त भग्नावस्थेतील मार्गातील दोन बुरुज आढळून आली.

हा ऐतिहासिक खजिना दुर्गप्रेमी समोर घेऊन येण्याचा प्रयत्नांना यश आले हा मार्ग गडाच्या पश्चिमेला आहे. या मार्गाची चढाई करण्यासाठी मध्यम श्रेणीचे टप्पे पार करत निसरड्या वाटेने रामशेज गडाच्या माथ्यावर पोहोचता येते. ही मोहीम सुरक्षित व यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी टीम पॉइंट ब्रेक एडवेंचर परिवारातील गिर्यारोहक जॅकी साळुंखे, हेमंत पाटील, चेतन शिंदे, विशाल बोडके, युगंधर पवार, भूषण जाधव यांचा समावेश होता.