नाशिक । प्रतिनिधी
राज्यातील विजेची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्यामुळे राज्यावर पुन्हा भारनियमनाचे संकट आले आहे. त्याचा फटका नाशिककरांनाही बसणार असून शहरात सुमारे तीन ते साडेतीन तासांचे भारनियमन सोमवार पासून होणार आहे.
सोमवार ते बुधवार सकाळी साडेसात ते नऊ आणि दुपारी अडीच ते सायंकाळी सव्वा चार पर्यंत तर गुरुवार ते रविवारी सकाळी नऊ ते पावणे अकरा वाजेपर्यंत आणि दुपारी सव्वाचार ते सायंकाळी पावणेसहा या कालावधीत पवन नगर, राणे नगर, गंगाखेड, कृषी नगर, विद्या विकास सर्कल, पाटिल कॉलनी, सद्गुरुनगर, राजे बहाद्दर, उदोजी मराठा या भागात भारनियमन होणार आहे. सोमवार ते बुधवार सकाळी नऊ ते पावणे अकरा आणि दुपारी सव्वा चार ते सायंकाळी सव्वा सात पर्यंत तर गुरुवार ते रविवार सकाळी साडेसात ते नऊ आणि दुपारी अडीच ते सायंकाळी सव्वा चार पर्यंत अश्विन नगर, विजय नगर, पी अँड टी कॉलनी, नवीन साधू ग्राम, माघ सेक्टर, चव्हाण मळा, सहदेव नगर, उंटवाडी, महात्मा नगर, सावरकर नगर येथे भारनियमन होणार आहे.
त्याच प्रमाणे उत्तम नगर, एकता नगर, कुलकर्णी कॉलनी, त्रिमूर्ती चौक, पंचक, गायत्री नगर, पंचवटी क्रीडासंकुल, टिळकवाडी याठिकाणी सोमवार ते बुधवार सकाळी साडेसात ते साडेनऊ, गुरुवार ते रविवार सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत भारनियमन होणार आहे. दुपारी देखील दोन आणि चार वाजता दीड तासांचे भारनियमन होणार आहे.
सोमवारी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा व दुपारी चार ते सहा या वेळेत तसेच गुरुवार ते रविवार सकाळी साडेसात ते साडेनऊ तसेच दुपारी दोन ते सायंकाळी साडेचार या वेळेत म्हसरूळ, पेठरोड, गोरक्षनगर, अशोक स्तंभ, आरटीओ, विशाल पॉइंट, एसटी कॉलनी, अमृतधाम, राममंदिर, सातपूर या ठिकाणी भारनियमन होणार आहे.
कलानगर, कालिका नगर, साईनगर, रविवार कारंजा, गोविंद नगर येथे सोमवार ते बुधवार सकाळी सहा ते साडे आठ, दुपारी पावणेदोन ते सायंकाळी साडेसहा या कालावधीत भारनियमन होणार आहे. गंजमाळ, लेखानगर, ठक्कर बाजार, गोविंदनगर, मोरवाडी येथेही सकाळी- सायंकाळी भारनियमन होणार आहे. सारडा सर्कल, औरंगाबाद रोड, जुने नाशिक, बुधवार पेठ, भद्रकाली मार्केट, दूध बाजार याठिकाणी देखील सकाळ- सायंकाळी तीन तीन तासांचे भारनियमन होणार आहे.