नाशिक । प्रतिनिधी
सातपूर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला ठीकठिकाणी गळती लागली असल्याने दुरुस्तीच्या कामामुळे परिसरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद असेल तसेच शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती मनपाने दिली आहे.
दरम्यान सातपूर परिसरातील जलकुंभ भरणारी पिण्याची थेट पाईपलाईनला खालील ठिकाणी गळती सुरू झाली आहे.. गळतीमुळे पाणी वाया जात असल्याच्चे नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मनपा कर्मचाऱ्यांना हि बाब सांगितली. या पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी उद्या प्रभाग सात मधील पूर्णवाद नगर, दादाजी कोंडदेव नगर, आकाशवाणी टॉवर परिसर, सहदेव नगर, सुयोजित गार्डन परिसर तर प्रभागआठ मधील सिरीन मेडोज, सोमेश्वर कॉलनी, आनंदवल्ली, सावरकर नगर, गुलमोहर कॉलनी, पाईपलाईन रोड परिसर, गुरुजी हॉस्पिटल मागील परीसर, विवेकानंद नगरला पाणीपुरवठा बंद असणार आहे.
याशिवाय प्रभाग नऊ मधील मोतीवाला कॉलेज परिसर, शिवशक्ती कॉलनी, नवीन धृवनगर परिसर आणि प्रभाग १२ मधील कल्पना नगर, मॉडेल कॉलनी, कृषी नगर परिसर, डिसूझा कॉलनी परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.