नाशिक । प्रतिनिधी
सातपूर येथील (Satpur) अशोक नगरमध्ये (Ashok Nagar) काल रात्री गॅस सिलिंडरच्या स्फोटात (Gas Cylinder Explode) एका महिलेचा मृत्यू (Women Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेत एक तरुणी देखील गंभीर जखमी (Girl Injured) झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की काल रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास अशोक नगर येथील तुळजा अपार्टमेंटमध्ये (Satpur Tulja Apartment) गॅस नळी मधून गॅसलीक होऊन अचानकपणे आगीचा भडका उडाला. यावेळी स्वयंपाक करत असणाऱ्या अर्चना या १०० टक्के भाजल्या गेल्या. त्यांना उपचारासाठी अस्वस्थ अवस्थेत नाशिक येथील शासकीय रुग्णालयात (Nashik Civil Hospital) दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला तर मुलगी हस्ता राजेंद्र सिंह ही देखील लगेच २० टक्के भाजले गेली. तिला अशोक नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये (Private Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान अर्चना यांचे पती राजेंद्र सिंह यांनी आगीतून दोघींना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु अर्चना या घाबरल्याने आगीतून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान स्फोटात घरगुती साहित्य जळून खाक झाल आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
यावेळी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक (Nashik Fire Brigade Squad) दाखल झाले होते. मात्र या दुर्दैवी घटनेत अर्चना राजेंद्र सिंह यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.