माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांना यशवंत जीवन गौरव पुरस्कार

नाशिक | प्रतिनिधी
धुळे लोकसभा मतदारसंघाचे (Dhule Lok Sabha constituency) माजी खासदार तसेच पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार प्रतापदादा सोनवणे (Ex MP Pratapdada Sonawane) यांना यशवंत जीवनगौरव पुरस्काराने (Yashwant Jivangaurav Award) सन्मानित करण्यात आले.

नाशिक निवासी सोनवणे परिवाराकडून (Nashik Sonwane Pariwar) पहिला वहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. मखमलाबाद रोड (Makhamlabad) येथील विठ्ठल रुख्मिणी मंगल कार्यालयात परिवाराचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बागलाणच्या (Baglan) माता द्वारका आक्का यांच्यासह अध्यक्ष जिभाऊ सोनवणे, सचिव हिरामण सोनवणे, खजिनदार किरण सोनवणे, डॉ संजय सोनवणे, शरद सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने सोनवणे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहरात (Nashik City) नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आलेले सटाणा शहरातील सोनवणे परिवारातील सदस्य आज एकत्र आले होते. यावेळी महिलांची संख्यादेखील मोठी होती. परिवारातील गुणवंतांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. यामध्ये मोटार वाहन निरीक्षक प्रांजल सोनवणे व पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या करिष्मा सोनावणे यांच्यासह आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्लेयर विराज सोनवणे, वेदिका सोनवणे व स्वरा सोनवणे या चिमुकल्यांचा सन्मान याप्रसंगी करण्यात आला. तसेच गणपती आरास स्पर्धेतील पर्यावरणपूरक गणपती आराससाठी एस टी सोनवणे यांनाही सन्मानित करण्यात आले.

तसेच शिक्षक अरुण सोनवणे यांची त्र्यंबक तालुका शिक्षक संघपदी निवड झाल्यामुळे त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच परिवाराचे उपाध्यक्ष चंद्रशेखर सोनवणे यांची सलग दुसऱ्यांदा सिटीझन बँकेच्या चेअरमनपदी अविरोध निवड झाल्यामुळे त्यांचाही गौरव यावेळी झाला. सायंकाळी रंगलेल्या या सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर ग्रामदैवत देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

आपण परक्या गावी असलो तरीदेखील आपण सगळे आज एकत्र आलो. अशीच एकी यापुढेही दाखवा. नियमित परिवाराच्या कार्यक्रमात एकत्र येत जा! प्रत्येकाच्या सुखदुख:त सहभागी होत जा! असे आवाहन याप्रसंगी ९२ वर्षीय द्वारका आक्कांनी उपस्थितांना केले. या कार्यक्रमात सन्मान झालेल्या मान्यवरांची निवड समिती अध्यक्ष माणिकराव सोनवणे, उपाध्यक्ष चंद्रशेखर सोनवणे, प्रा. बापू सोनवणे, केदा सोनवणे यांनी केली होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिवाराचे अध्यक्ष जिभाऊ सोनवणे, सचिव हिरामण सोनवणे, खजिनदार किरण सोनवणे, डॉ संजय सोनवणे, रमेश सोनवणे, विलास सोनवणे, प्रशांत सोनवणे, शरद सोनवणे, नरेंद्र सोनवणे, अरुण सोनवणे, केदा सोनवणे परिश्रम घेतले.

माझा परिवार एकत्र आल्याचा आनंद
कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मनस्वी आनंद होत आहे. गेली अनेक वर्षे जनतेची सेवा केली. उतरत्या काळात आपणास शहरात भाऊबंदकी मिळाल्याने याचा नक्कीच आनंद व्यक्त होत आहे.
– माजी खासदार प्रतापदादा सोनवणे

मोफत उपचार करणार
आमच्या सटाणा आणि नाशिकमधील दवाखाण्यात देशभरातून रुग्ण उपचारासाठी येतात. कुठलीही शस्रक्रिया न करता ३० ते ३५ दिवसांत रुग्णाला आजारातून मुक्त करण्यासाठी विशिष्ट उपचार केले जातात. हे उपचार आपल्या परिवारातील हालाखीच्या परिस्थितीत असलेल्या सदस्यांना मोफत करण्यात येतील. व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी आपण नियमित प्रयत्न करू.
– डॉ संजय पाटील, सटाणा