हिवाळी अधिवेशनात नाशिकची ‘आमदार आई’ चर्चेत

Nagpur Winter Session : नागपूर हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात अनेक मुद्दयांवर चर्चा होणार मात्र त्या आधी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांची चर्चा होत आहे. सरोज अहिरे-वाघ या त्यांच्या अडीच महिन्याच्या चिमुकल्याला घेऊन विधानभवनात पोहोचल्या आणि त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून आईच्या प्रेमाची चर्चाही होत आहे.

नाशिकच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या दोन वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन विधानभवनात दाखल झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. बाळाला घेऊन राष्ट्रवादीच्या आमदार हिवाळी अधिवेशनात दाखल झाल्या. बाळ आणि मतदार संघाचे प्रश्न दोन्हीही महत्वाचे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

नागपूर हिवाळी अधिवेशन (Nagpur Winter Session ) आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) वाघ त्यांच्या अडीच महिन्याच्या चिमुकल्याला घेऊन विधानभवनात पोहोचल्या. ‘मी आई आहे त्यासोबतच आमदारही आहे, त्यामुळे दोन्ही कर्तव्य महत्त्वाचे आहे. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही तसेच मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मला बाळाला घेऊन यावं लागलं.’ अशी भावना अहिरे यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी व्यक्त केली.

दरम्यान त्यांच्या या व्हिडिओने एकाच वेळी दोन कर्तव्य करणारी महिला विशेष म्हणजे ‘आई’ म्हणून कौतुक केलं जात आहे. ३० सप्टेंबरला सरोज आहिरे आई बनल्या. त्यानंतर त्यांचं प्रथमच अधिवेशन असल्याने आणि बाळ त्यांच्या शिवाय राहू शकत नसल्याने त्या बाळ, पती आणि अन्य कुटुंबीयांसह त्या विधानभवनात पोहोचल्या. तर कुटुंबीय बाळाला संभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघाचे प्रश्न अमांडेल असेही, अधिवेशन किती दिवस चालेल हे माहीत नाही मात्र लोकांचे अधिकाधिक प्रश्न सोडवण्यावर आपला भर राहणार आहे, अशी देखील माहिती यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे.

आई कोणतही काम करत असो, ती कोणत्याही पदावर असो ती आईच असते. अहिरे यांच्या समोर आलेल्या या व्हिडिओने मात्र हिरकणीप्रमाणे आईच्या प्रेमाची आठवण करून दिली. त्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून ‘आई ही आईच असते’ अशा कमेंट देखील बघायला मिळत आहेत. तर थेट विधानभवनात अडीच महिन्याच्या चिमुकल्याला घेऊन पोहोचलेल्या सरोज अहिरे यांचा हा व्हिडिओ :

पहा, सरोज अहिरे यांचा त्यांच्या अडीच महिन्याच्या चिमुकल्यासोबतचा, विधानभावना वरचा हा खास व्हिडीओ