Audio : ‘तुम्ही मुस्लिम असूच शकत नाही!’ नाशिकमधील मनसे नेत्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

नाशिक । प्रतिनिधी

राज ठाकरेंच्या भोंगे काढण्याच्या भूमिकेला समर्थन देणारे मनसे नगरसेवक सलीम शेख यांच्या विरोधात मुस्लिम समाज आक्रमक झाला असून या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याचे पडसाद नाशिक शहरातही पाहायला मिळाले. या निर्णयासंदर्भात मनसेच्या काही मुस्लीम कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला तर काहींनी नाराजी दर्शवली आहे. याबाबत नाशिकमधील मनसेचे माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी भोंगे काढण्यासंदर्भात वक्तव्य केल्याने मुस्लिम समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान या संदर्भात एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. जामनेर येथील युवक व मनसेचे माजी नगरसेवक सलीम शेख यांच्यातील संवादाची हि ऑडिओ क्लिप असून या युवकाने सलिम शेख यांना ‘तुम्ही मुस्लिम असूच शकत नाही, DNA टेस्ट करून घ्या’ असा अजब सल्ला दिला आहे.

तसेच ‘भोंगे काढताय, तर तुम्ही स्वता हनुमान चालीसा देखील सुरू करा’ असा सल्ला देखील दिला आहे. सदर फोन करणारी व्यक्ती ‘मी जावेद मुल्ला जामनेरचे माजी उपनगराध्यक्ष असल्याचा दावा करीत आहे.