नाशिक | प्रतिनिधी
नाशिकच्या उंटवाडी परिसरात असलेल्या सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागील नंदिनी नदीतील बांबूच्या झाडांना दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक पणे आग लागली.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने आगीने काळ रौद्ररूप धारण केले होते. आगीची माहिती अग्निशामक दलाला मिळतातच अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशामक दलाने तात्काळ आग आटोक्यात आणली. ही आग उन्हामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाचा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. उन्हामुळे अशा घटना होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
दरम्यान अलीकडेच मनपा मार्फत नंदिनी नदीच्या काठावर ६२ कॅमेरे बसवणार सूतोवाच देण्यात आले आहेत. मात्र नंदिनी नदीत आज झालेल्या घटनेमुळे लवकर सीसीटीव्ही बसवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.