अवैध वृक्षतोड प्रकरण; नाशिकच्या खासदार पुत्रासह एकाला 4 लाखांचा दंड.

By चैतन्य गायकवाड ।

नाशिक : नाशिकचे खासदार (Nashik MP) पुत्र व त्यांचे व्यवसायातील भागीदार या दोघांना विनापरवानगी अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी ४ लाख २० हजारांचा दंड ठोठवण्यात आला आहे. इमारत बांधकामासाठी वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी न घेता अवैधपणे वृक्ष तोडल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.

याप्रकरणी खासदार हेमंत गोडसे (Hemant Godase) यांचे पुत्र अजिंक्य गोडसे (Ajinkya Godse) आणि त्यांचे व्यवसायातील भागीदार योगेश ताजनपुरे (Yogesh Tajanpure) यांना नाशिक महानगर पालिकेने (NMC) नोटिस बजावली आहे. तसेच ७ दिवसांच्या आत दंड न भरल्यास फौजदारी स्वरूपाची होणार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

नाशिकच्या खासदार पुत्राच्या सांगण्यावरून त्यांच्याच भुखंडातील नाशिकरोड (Nashikroad) विभागातील प्रभाग क्रमांक (ward no) 19 मधील देवळाली शिवारातील सर्व्हे नंबर 193/20 ब, न्यू बालाजी ढाब्याशेजारी जुना ओढा रोड येथे असलेल्या भूखंडवरील वृक्षतोड करण्यात आल्याची माहिती आहे. या वृक्षांमध्ये 5 काटेरी बाभूळ ,१ रेन्ट्री आणि १ काशीद प्रजातीचा समावेश आहे. या वृक्ष तोडीसाठी मनपा उद्यान विभागाची कुठलीही परवानगी न घेता अवैध कत्तल करण्यात आली आहे.

यामुळे नाशिक महापालिकेने नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचे पुत्र अजिंक्य हेमंत गोडसे आणि योगेश ताजनपुरे यांना महापालिकेने नोटीस बजावली असून ४ लाख 20 हजारांचा दंड ठोठावला आहे.