जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेने गळफास घेऊन केली आत्महत्या..

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्हा शासकीय रुग्णालयातील (District government hospital) परिचारिकेने (nurse) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी (thursday) (दि.२) पंचवटीतील (Panchavti) तारावालानगर येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी पंचवटी पोलिस स्थानकात (Panchavati Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शीतल अरविंद सरोदे (Sheetal Arvind Sarode) असे मृत अधिपरिचारिकेचे नाव आहे. शीतल यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल अरविंद सरोदे ( ३८, रा. गोकुळ सोसायटी, तारवालानगर, दिंडोरीरोड ) यांनी गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. शीतल यांच्या भावाने हा दु:खद प्रकार बघितला. शीतल यांना जिल्हा रुग्णालयात (district hospital) दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (medical officer) त्यांना तपासून मृत (dead) घोषित केले.

शीतल या जिल्हा रुगणालयात अतिदक्षता विभागात कार्यरत होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांची मालेगाव येथे बदली झाली होती. दरम्यान, त्यांच्या अकस्मात मृत्यूची माहिती मिळताच त्यांच्या सोबतच्या परिचारिकांना अश्रू अनावर झाले. मनमिळावू व हसतमुख असलेल्या शीतल यांच्या मृत्यूने त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.