Nashik Crime|नाशिक पोलिसांनी केला देहविक्री व्यवसायाचा भांडाफोड

नाशिक : शहरामध्ये देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांवर मुंबई नाका पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ३ पुरुष आणि ५ महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई नाका पोलिसांना गुप्त माहितीनुसार नाशिकच्या वडाळा नाका भागात असलेल्या कोर्टयार्ड हॉटेलच्या शेजारी एका बंगल्यात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई नाका पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी छापा टाकत कारवाई केली होती. या कारवाईत ९ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांवर पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार नाशिक शहर पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई नाका पोलिसांनी कारवाई केली.

पोलिसांना काल गुप्त बातमीदार मार्फत नाशिकच्या वडाळा नाका भागात असलेल्या कोर्टयार्ड हॉटेलच्या शेजारी एका बंगल्यात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नकली ग्राहक पाठवून या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पाच महिलांची सुटका करण्यात आली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान एक आरोपी फरार असल्याची देखील माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात भादवी कलम ३७० तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध क कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ आणि ७ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

१९५६ चे कलम ३, ४, ५ आणि ७

अव्यापार करणाऱ्याला किंवा वैशाव्यवसायाच्या कमाईवर उपजीविका केल्याबद्दल भारतीय संविधानाच्या १९५६ चे कलम ३, ४, ५ आणि ७ च्या कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते. व्यक्तीला वैश्या व्यवसाय करण्यासाठी प्राप्त करणे, मिळवणे, प्रवृत्त करणे किंवा घेणे हे या कलमानुसार अवैध आहे. जिथे वैश्या व्यवसाय चालतो, त्या जागेत व्यक्तीला अडकून ठेवणे, वैश्यव्यवसायाच्या प्रयोजनार्थ फितवने किंवा मोह घालणे यासाठी दंडाची पूर्तता या कायद्यात केलेली आहे.

माहितीसाठी :

संपूर्ण देशाला १९५६ साली स्त्रिया आणि बालकांच्या अनैतिक व्यापार रोखणारा कायदा पारीत करण्यात आला. ६ लाखाहून अधिक बालक आणि स्त्रिया यांच्या बेकायदेशीररित्या लैंगिक शोषणासाठी, भीक मागण्यासाठी आणि अवयव तस्करीसाठी पळवून नेऊन खरेदी-विक्री केली जाते. जगभरामध्ये ड्रग्ज आणि अंमली पदार्थांचा व्यापार, शस्त्रास्त्रांचा व्यापार याचे व्यवहार आणि आर्थिक उलाढालयामध्ये अंमली पदार्थाचा एक नंबर, दोन नंबरला शस्त्रास्त्र आणि तीन नंबरला मानवी तस्करीचा नंबर लागतो.