गुड न्यूज! नाशिककरांना मिळणार दोन हजारांहून अधिक म्हाडाची घरे, ‘या’ महिन्यात निघणार सोडत

नाशिक । प्रतिनिधी
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नाशिककरांना (Nashik) एक गुड न्यूज दिली आहे. होय, आपल्या हक्काच्या घरासाठी नाशिककरांना आता वाट पाहवी लागणार नाही. येत्या मी जून पर्यत म्हाडाच्या घरांसाठी (MHADA Homes) सोडत निघणार असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

दरम्यान नाशिक येथील म्हाडाच्या घरांबाबत तत्कालीन मनपा आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात चांगलीत जुंपली होती. त्यानंतर आव्हाड यांनी चौकशीचे आदेश दिले होते. अखेर आता नाशिककरांना तब्बल २०३१ म्हाडाची घरे मिळणार आहे. या संदर्भातील ट्विट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या माहितीमध्ये, ‘नाशिकमध्ये २०१३ ते २०२२ पर्यंत १५७ घरे म्हाडाला मिळाली होती. ह्यामध्ये काहीतरी घोटाळा आहे, असे माझ्या ध्यानी येताच चौकशी सुरु केली. आजमितीपर्यंत २०३१ घरे म्हाडाला प्राप्त झाली आहेत. आणि त्याची सोडत व लॉटरी मे आणि जून महिन्यात करण्यात येणार आहे’, असे म्हटले आहे.

नाशिकमध्ये जवळ जवळ ०५ हजार घरे मिळतील असा अंदाज आहे. नाशिक हे माझे गाव असल्याने मी स्वत: तिथे जाऊन म्हाडाची लॉटरी काढेन असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.