Video : नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वाहनाला अपघात, दहा जण जखमी

नाशिक । प्रतिनिधी

इगतपुरीजवळ पोलिसांच्या गाडीला (Police Van accident) भीषण अपघात (Igatpuri Accident) झाला असून या अपघातात दहा जण जखमी झाले आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) माणिकखांब या गावाजवळ हा अपघात झाला आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. नाशिक ग्रामीण पोलीस (Nashik Rural Police) व्हॅन मुंबईच्या दिशेने निघाली होती. मात्र महामार्गावरील माणिकखांब येथील पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. सदर अपघातात एक जण गंभीर तर दहा जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघात झाल्यानंतर तात्काळ नजीकच्या ट्राफिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताची पाहणी केली. तसेच जखमींना तात्काळ घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात (Ghoti Rural Hospital) पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त लवकरच….