नाशिक हादरलं..! भरदिवसा वडापाव विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला

नाशिक : वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या सत्रात नाशिकमधून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी एका वडापाव विक्रेत्यावर हल्ला केल्याची (Attack on a vada pav seller in Nashik) आहे. विशाल गोसावी या वडापाव विक्रेत्यावर टवाळक्याकडून हल्ला करण्यात (Vadapav seller attacked by mob) आला. शहरातील नाशिकरोड (Nashikroad) परिसरातील ही घटना आहे. कोयता आणि इतर धारधार हत्याराने हल्ला (Assault with Koyta and other sharp weapons) केल्याची ही घटना परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाली आहे.

नाशिकरोड परिसरातील या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये गाडीवर एक टोळके अचानक येऊन वडापाव विक्रेत्यावर कोयता आणि इतर धारधार हत्याराने हल्ला करताना दिसून येत आहे. त्यासोबतच हल्लेखोरांनी गाड्यावर असलेले सामान देखील रस्त्यावर फेकताना कॅमेऱ्यात कैद झालं आह. हल्ला होताच वडापावच्या गाड्याजवळ असलेले नागरिक भयभीत होतात आणि ते तेथून पळ काढतात. दरम्यान हल्लेखोर त्याठिकाणी उपस्थित अजून एका व्यक्तीवरही हल्ला करतात आणि गाडीवर बसून त्या ठिकाणहून पळ काढतात. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी जुन्या वादातून वडापाव विक्रेत्यावर हल्ला (Attack on vada pav seller due to old dispute) झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान कोयता आणि इतर धारधार हत्याराने हल्ला करत भर रस्त्यावर दहशत माजावण्याचा प्रयत्न याठिकाणी करण्यात आला आहे. या हल्ल्यात एकजण जखमी झाला असून नाशिक रोड पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरुद्ध (Nashik Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहे.

दरोडा आणि हत्येच्या एका घटनेनंतर या हल्ल्याची घटना शहरातून समोर आल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सशस्त्र टोळक्यांचा हैदोस नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करतो. अशा एक ना अनेक घटना नाशिकमध्ये घडत आहे. त्यामुळे गुन्हेगारांना ना दिवसाच्या उजेडाचा ना पोलिसांचा धाक उरलाय अशी परिस्थिती दिसून येत आहे. बिनधास्तपणे शहरात हत्यार घेऊन दहशत निर्माण करण्याचे काम काही गुन्हेगार करत आहे. तर कधी चोरी, लुटमार, दरोडा हत्या अशा घटनांमुळे शहर गुन्हेगारीचा अड्डा बनत चालले आहे. त्यामुळे ‘इस शहर को ये हुआ क्या’ असाच प्रश नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे.