नाशिक । प्रतिनिधी
श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने नाशिक शहरातील पंचवटीतील वाहतूक मार्गात मार्गात बदल करण्यात आला असून याबाबतचा निर्णय नाशिक शहर वाहतूक शाखेने घेतला आहे.
दोन वर्षाच्या व्यत्ययानंतर नाशिकमध्ये रॅम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या रामनवमी च्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी रथोत्सव काढण्यात येणार आहे. यामुळे पंचवटीतील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
काळाराम मंदिर पूर्व दरवाजा, गौरी पटांगण, गाडगे महाराज पटांगण, साईबाबा मंदिर, रामकुंड, अंबिका चौक, शनी चौक, काळाराम मंदिर उत्तर दरवाजापासून नाग चौक, काट्या मारुती पोलीस चौकी, देवी मंदिर गणेशवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय, गौरी पटांगण, रोकडोबा मारुती मंदिर, गाडगे महाराज पुलाखालून नेहरू चौक, चौक शनी, चौक, काळाराम मंदिर चौक असा रथाचा मार्ग आहे.
पर्यायी मार्ग : काट्या मारुती चौकाकडून गणेश वाडी मार्गे मेन रोडकडे जाणारी वाहने काट्या मारुती चौक, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा मार्गे इतरत्र जातील. काट्या मारुती चौक, संतोष टी पॉईंट, द्वारका सर्कल मार्गे इतरत्र जातील व येतील.