By चैतन्य गायकवाड |
नाशिक : नाशिकला (Nashik) पाणीपुरवठा (Water supply) करणाऱ्या गंगापूर धरण (Gangapur dam) समूहात अवघा २७ टक्केच (percentage) जलसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच काळात गंगापूर धरण समूहात ३० टक्के जलसाठा उपलब्ध होता. गंगापूर धरण समूहातील मोठा प्रकल्प असलेल्या गंगापूर धरणात अवघा ३१ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे नाशिकवर पाणी कपातीचे सावट येणार का, हा प्रश्न आहे. त्यामुळे वरुण राजा केव्हा बरसणार, याचीही वाट पहावी लागणार. पाऊस लांबल्यास नाशिकवर पाणी कपातीचे सावट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात यावर्षी अवघा २७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी गंगापूर धरण समूहात ३० टक्के जलसाठा उपलब्ध होता. गंगापूर धरण समूहातील मोठा प्रकल्प असलेल्या गंगापूर धरणात अवघा ३१ टक्के जलसाठा आहे. या धरणात १७२४ दश लक्ष घनफुट म्हणजे ३१ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी या कालावधीत गंगापूर धरणात ४३ टक्के जलसाठा उपलब्ध होता. तसेच गंगापूर धरण समूहातील काश्यपी (Kashyapi) आणि गौतमी गोदावरी (Gautami Godavari) या मध्यम प्रकल्पात अनुक्रमे 20 टक्के आणि ३४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. तर आळंदी (Alandi) धरणात अवघा ४ टक्के पाणीसाठा आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील गंगापूर (Gangapur), करंजवण (Karanjvan), दारणा (Darana), मुकणे (Mukane), कडवा (Kadava), चणकापूर (Chanakapur) आणि गिरणा (Girna) यांसारख्या मोठ्या प्रकल्पातील जलसाठा हा निम्म्याहून खाली आला आहे. गंगापूर धरणात ३१ टक्के, करंजवण धरणात २४ टक्के, दारणा धरणात २८ टक्के, मुकणे धरणात ३७ टक्के, कडवा धरणात १८ टक्के, चणकापूर धरणात ३७ टक्के आणि गिरणा धरणात ३७ टक्के असा जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही तर जिल्हावासियांवर पाणीटंचाईचे सावट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गिरणा खोरे धरण समूहातील मध्यम आकाराचे प्रकल्प असलेले नागासाक्या (Nagasakya) आणि माणिकपुंज (Manikpunj) धरण अक्षरशः कोरडेठाक पडले आहे. तर केळझर (Kelzar) प्रकल्पात अवघा ६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पालखेड (Palkhed) धरण समूहातील तिसगाव (Tisgaon) मध्यम आकाराच्या प्रकल्पात अवघा २ टक्के पाणीसाठा आहे. तसेच वाघाड (Vaghad) धरणात ५ टक्के, भावली (Bhavali) धरणात ९ टक्के तर भोजपूर (Bhojpur) धरणात ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील इतर धरणांमध्येही कमी प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे.