नाशिकचे सिडको कार्यालय सुरु मात्र अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

नाशिक : सिडको नाशिकमधेच राहणार असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर सिडको मधील कार्यालय बंद करण्याचा निर्णय शासनाने दिला होता. सिडकोतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदस्थापना करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. नाशिकमध्ये विकासाच्या दृष्टीकोनातून सिडकोची स्थापन केली होती. आत्ता नाशिकमधेच सिडको राहणार असा निर्णय झाल्यामुळे सिडकोमधील कार्यालय बंद करण्याचा आदेश देण्यात आला होता. परंतु सिडकोशी संबंधित असलेल्या अनेक प्रश्नांबाबत नागरिकांना या कार्यालयाची गरज आहे. सिडको कार्यालय बंद झाल्यास न हरकत दाखला, मिळकत हस्तांतर, या सारखी महत्वाची आणि लहान मोठी कामे करण्यासाठी सामान्य नागरिकांना औरंगाबाद येथे फेऱ्या माराव्या लागतील.असा प्रश्न उपस्थित होत होता. सिडको प्रशासन कार्यालय बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात राजकीय पक्ष व नागरिकांनी व्यक्त केलेला असंतोष लक्षात घेता सिडकोतील कार्यालय बंद न करण्याचा व आवश्यक कर्मचारी ठेऊन काम सुरु ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी दिला.

या निर्णयामुळे सिडको मधील रहिवाश्यांना दिलासा मिळाला आहे. पण अशातच सिडको मधील कर्मचार्यांची संख्या कमी असताना शासनाने प्रशासाकांसह आठ अधिकारी, कर्मचाऱ्यासह तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. सिडकोतील नागरिकांना त्यांच्या छोट्या मोठ्या कामांसाठी औरंगाबाद येथे चक्कर माराव्या लागू नये ,हाणून सिडको मधील कार्यालय बंद न करण्याचा निर्णय शासनाने दिला परंतु अचानक केलेल्या या बदल्यांमुळे नागरिकांचे कामे अजूनच रखडणार आहे असे चित्र दिसत आहे. कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या असून यात प्रशासक कांचन बोधले यांचा सुद्धा समावेश आहे.

नाशिक सिडको कार्यालयाला दोन लिपिक एक शिपाई एक लेखा विभागातील कर्मचारी ठेवण्यात आलेले आहे. सिडको मधील दैनंदिन काम बघता शेकडो लोक कार्यालईन कामकाज साठी येत असतात. कर्मचारी बळ व नाशिक सिडको कार्यालया मधील कामचा भार बघता नाशिकरांचे कामे अजून रखडणार असून याचा त्रास नाशिकरांना होण्याची शक्यता आहे. सिडको कार्यालया मध्ये किमान ४ ते ५ लिपिकांची गरज असून त्या प्रमाणे संख्या वाढवल्यास नागरिकांचे काम सुलभतेने होतील. असे सांगितले जात आहे.