राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आदित्य ठाकरेंच्या भेटीला म्हणाल्या..

नाशिक : युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली, व राष्ट्रवादी महिला काँग्रेस शिवसेने सोबतच आहे. असे प्रतिपादन केले आहे. तसेच महाविकास आघाडी एकत्रच आहे असा दावा देखील या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले त्यामुळे शिवसेनेत मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे राज्यात युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी विशेष दौरा करून पुन्हा पक्षाची मोट बांधायला प्रारंभ केला आहे. गुरुवारी आदित्य ठाकरे यांनी मुंबई येथील शिवसंवाद यात्रेला प्रारंभ केला.


नाशिक जिल्ह्यात दोन आमदार आणि एक खासदारांनी बंडखोरी केल्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांची चाचणी करणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने आदित्य ठाकरे यांची ही भेट महत्त्वाची ठरत आहे. यावेळी बैठकीला हजर-गैरहजर असणार्‍यांची उजळणी घेतली जाणार आहे. ठाकरे यांनी भिवंडी शहापूर इगतपुरीयेथील शिवसैनिाकंशी संवाद साधून सायंकाळी सहा वाजता नाशिकला दाखल होणार होते. अश्यातच, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली आहे. व राष्ट्रवादी महिला काँग्रेस शिवसेनेसोबतच आहे. असे प्रतिपादन देखील या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच महाविकास आघाडी एकत्रच आहे असा दावा देखील या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना शिवसैनिकांचा तर प्रतिसाद मिळतोच आहे. मात्र महाविकास आघडी तत्कालीन सत्तेत सोबत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचेही पाठबळ ठाकरे यांना मिळत आहे.