By चैतन्य गायकवाड
नाशिक : सध्या देशभरात कोरोना (corona) बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यात महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक रुग्ण वाढत आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात गुरुवारी (दि. १६) कोरोना बाधितांच्या संख्येत 20 च्यावर वाढ झाली आहे. गुरुवारी २४ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यात १४ बाधित नाशिक महापालिका (NMC) क्षेत्रातील असून नाशिक ग्रामीण भागातील ७, मालेगाव मनपाच्या हद्दितील ० तर जिल्हाबाह्य तीन बाधितांचा समावेश आहे. तर दिवसभरात जिल्ह्यात एकूण 20 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दरम्यान, दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोना प्रलंबित अहवालांची संख्या ४९३ वर पोहचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना मुक्ततेचे प्रमाण ९८.११ टक्के इतके आहे. जिल्ह्यात कोरोनाचा सकारात्मकता दर (Positivity rate) २.४१ टक्के इतका झाला आहे. जिल्ह्यात उपचाराधीन कोरोना रुग्णांची (Active patients) संख्या ११२ इतकी झाली आहे. तर आजवर नाशिक जिल्ह्यात एकूण ८८९९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोना बाधितांची संख्या… गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार २५५ नवीन कोरोना बाधितांची (new corona cases) नोंद झाली आहे. तर २ हजार ८७९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील सकारात्मकता दर ९.५२ टक्के इतका झाला आहे. राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या 20 हजार ६३४ इतकी आहे. तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात मुंबईत २ हजार ३६६ कोरोनाबाधित आढळले आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत आहे. त्यांची संख्या १३ हजार ००५ इतकी आहे. तर त्यांनतर ठाण्यात ३९७८ सक्रिय रुग्ण आहेत. तिसऱ्या क्रमाकांवर पुणे असून, इथे सक्रिय रुग्णांची संख्या १४३५ इतकी आहे. चौथ्या क्रमांकावर रायगड असून, इथे ७०९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर पालघर येथे ६२५ सक्रिय रुग्ण आहेत.
दरम्यान, देशात देखील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. काल दिवसभरात देशात एकूण १२८५६ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ६१ हजार ७०६ इतकी झाली आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना रुग्ण वेगाने वाढत असले, तरी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण त्या तुलनेत कमी आहे.