येवला : अफगणिस्तान देशातील सुफी धर्मगुरु जरीफ बाबा चिश्ती (Afghan citizen) यांची गाेळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येत पोलीसांचा नवा खुलासा समोर आला आहे. जरीफ बाबा बॉलीवूडचे तिन्ही खान सुपरस्टार (Bollywood star) म्हणजेच सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या अभिनेत्यांचे फोटो वापरून यूट्यूब चॅनलवर आपले फॉलोवर्स वाढवत होते. जरीफ बाबा यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बनवून हे तिन्ही अभिनेते आपला सल्ला घेऊन इतके मोठे झाले आहे असं भासवायचे. त्यामुळे बाबांचे सोशल मीडियावरील फोलोवर्स देखील वाढले होते आणि त्या माध्यमातून त्यांना उत्पन्न देखील चांगले मिळत होते. अशी माहिती पोलिसांन मिळाली आहे.
येवला (Yeola) तालुक्यातील चिंचाेडी -बदापूर एमआयडीसीत जरीफ बाबाची हत्या झाली होती. जरीफ बाबाची प्राॅपर्टी डाेळ्यात खुपल्याने त्यांच्या ड्रायव्हर आणि सेवेकर्यांनीच ही हत्या केल्याचं पोलिस तपासात समाेर आलं होतं. मात्र, जरीफ बाबाकडे एवढी मालमत्ता कशी आली याचा शोध घेतला असता, युट्युब जरीफ बाबाच्या कमाईचं मोठं साधन असल्याचं पोलिसांना कळालं. जरीफ बाबा बॉलीवूडचे तिन्ही खान सुपरस्टार अभिनेत्यांचे फोटो वापरून यूट्यूब चॅनलवर आपले फॉलोवर्स वाढवायचे आणि त्या माध्यमातून त्यांना उत्पन्न देखील चांगले मिळत असल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं आहे.
जरीफ बाबाच्या बँक खात्याची तपासणी सुरु
जरीफ हे निर्वासित (Refugee) असल्याने त्यांना भारतात मालमत्ता विकत घेता येत नव्हती. अशात त्यांनी त्यांचा चालक, सेवेकरी व विश्वासू लोकांच्या नावाने अनेक मालमत्ता खरेदी केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी बँकेककडून माहिती मिळवत आहे. जरीफ बाबाने कोणाशी किती रुपयांचे व्यवहार केले, या माहितीतून तपास बराचसा पुढे सरकेल अशी शक्यता आहे. मिळणाऱ्या बँक व्यवहारांच्या नाेंदीवरुन पुढील तपास केला जाणार आहे. या हत्येचा उलगडा हाेण्यासाठी पाेलिस बाबांच्या बँक खात्याची तपासणी करतील, त्याने कुणाकडे, कधी आणि किती रुपयांचे व्यवहार केले ही माहिती मिळाल्यानंतर तपासाला दिशा मिळण्याची शक्यता जिल्हा ग्रामीण पाेलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी वर्तवली आहे. जरीफ बाबाच्या बँक बरोबरच फरार संशयितांचा देखील तपास सुरु आहे. फरार हल्लेखोर संशयितांच्या मागावर पोलिसांचे तपास पथकं रवाना करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.