निखिल भामरेचा ताबा मुंबई गुन्हे शाखेकडे ..

नाशिक: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरेचा ताबा मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी नाशिक कोर्टातून निखिल भामरेचा ताबा घेतला आहे. मुंबई पोलिस उद्या निखिलला कोर्टात हजर करणार आहे.

मूळ सटाणा तालुक्यातील पिंगळवाडे येथील निखिल भामरे यास दिंडोरी पोलिसांनी अटक केली होती. तसेच त्याची चौकशी सुरु होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध त्याने आक्षेपार्ह भाषेत ‘ट्विट’ केले होते. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निखिल भामरेच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत कडक कारवाई ची मागणी केली होती. यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली होती. दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यांनतर त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरोधात ठाणे तसेच बारामती पोलिस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.