निलेश राणे यांचे राऊतांना उत्तर म्हणाले’स्वत: दहावी दोनदा नापास..

राज्यात सत्ता पालट झाल्यानंतर आता शिवसेनेत दोन गट तयार झाल्यानंतर शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील शाब्दिक चकमक रोजच सुरु असल्याचे बघायला मिळत आहे .अश्याच प्रकारे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटातील शिवसेना नेते विनायक राऊत यांनी खोचक टीका केली होती. यात भाजपच्या निलेश राणे यांनी उडी घेत राऊत यांच्या टीकेला निलेश राणे यांनी उत्तर दिलं आहे.त्यामुळे आता या टिकास्रावरून कोकणातील ह्या दोन नेत्यांमध्ये हा वाद वाढणारा असल्याचे दिसत आहे .


विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वत: ट्विट करता येतं का? असा प्रश्न विचारून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता ‘एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कुणीतरी लिहून द्यायचं आणि ट्वीट करायचं. स्व:तच्या हातानं ट्वीट करता येतं का? एकनाथ शिंदेंना आमदार केल्याचा मला पश्चाताप होत आहे. माझ्या हातून मोठे पाप झाले आहे. मी शिफारस केली नसती तर त्यांना आमदारकी मिळाली असती का?’ असा खोचक सवालहि राऊत यांनी विचारला होता. आणि याच्यावरच भाजप नेते निलेश राणे यांनी उत्तरं देत विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. राणे यांनी ट्विट करत राऊतांना उत्तर दिले आहे .

निलेश राणे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये विनायक राऊत यांचा एकेरी उल्लेख करत ‘तो खासदार विन्या राऊत कोण किती शिकलं आणि कोणाला ट्वीट करता येत नाही ते हा सांगतोय, हा स्वतः दहावी दोनदा नापास जवळपास शिवसेनेच्या बारा वर्षाच्या सत्तेत याला एकदाही साधा राज्यमंत्री केला नाही आणि हा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तींवर टीका करतो.’ असं उत्तर निलेश राणेंनी दिलं आहे.त्यामुळे आता पुन्हा एकदा राणे विरुद्ध राऊत असा वाद पहायला मिळू शकतो.शिवसेनेच्या दोन गटातील शाब्दिक वाद राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरत असून त्यात आता इतरही पक्षतील नेते उडी घेत असल्याचे दिसून येत आहे.