नाशिक मध्ये नितेश राणेंच मोठ वक्तव्य..!पहा काय म्हणाले राणे

नाशिक | आज भाजप आमदार नितेश राणे हे नाशिक दौऱ्यावर आले होते त्यांच्या नेतृत्वात हिंदू देवदेवतांच्या मूर्तींची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणी साठी नाशिक शहर भाजपच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा देखील काढण्यात आला होता .या दरम्यान आमदार नितेश राणे पत्रकारांशी बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध मुद्यांवरून धारेवर धरत संजय राऊतांवर देखील चांगलीच खोचक टीका केली .या वेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले कि हिंदूच्या देवांची अशा प्रकारे विटंबना केली जात आहे.

बाळसाहेबांचा मुलगा हे कस सहन करू शकतो ,या लोकांना अशा प्रकारे पोस्ट करण्याची सूट दिलीय का अशा प्रश्न देखील यावेळी नितेश राणे यांनी उपथित करत कारवाई झाली नाही तर आमचा संयम सुटेल अशा इशारा या वेळी नितेश राणे यांनी दिला. पुढे नितेश राणे म्हणाले या नंतर जर कायदा सूव्यवस्था बिघडली तर आम्ही जबाबदार राहणार नाही पवारांवर कविता लिहिली तिला आत टाकली मग हिंदू देवदेवतांची विटंबना करणारे का सापडत नाहीत अशी असा खोचक सवाल हि राणे यांनी उपस्थित केला.

पोलिसांना सगळी माहिती दिली आहे पोलिसांनी कारवाई करावी हिंदू संघटनांनी संयम सोडला तर बोलू नका अशी प्रतिक्रिहिया आमदार राणे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना दिली. त्याचा प्रमाणे राणे म्हणाले सगळ्या देव धर्माला एकच न्याय द्यावा पोलिसांनी खरी मर्दानगी आता दाखवावी सिंघम सारखं सगळी कडे कारवाई साठी जाणारे नाशिक पोलीस आता काय करत आहे अशा प्रश्न देखील विचारला पोलिसांनी हिंदू देवदेवतांच्या मूर्तींची विटंबना करणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई कारवी अशी मागणी केली .

येणाऱ्या अधिवेशनात आम्ही सरकारला या विषयावरून धारेवर धरू असे देखील नितेश राणे यांनी सांगितले.काश्मीर मध्ये होणाऱ्या हत्यांवरून शिवसेने कडून भाजपला कोंडीत पकडण्याचा डाव चालू असून काल नाशिकमध्ये काश्मीरच्या मुद्यावरून शिवसेनेनं आंदोलन देखील केले होते . या वरून नितेश राणे यांनी नाशिक शहरातील कायदा सुवेवस्थेवर बोलत म्हणाले काश्मीर बिश्मिर नंतर बोला इथे २० दिवसात आठ खून झाले आहेत अगोदर इथला हिंदू सुरक्षित करा असं म्हणत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.

उद्धव ठाकरेना काँग्रेस राष्ट्रवादीची भीती वाटते
आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेवरून आणि संभाजीनगर नामांतरच्या मुद्यांवरून टीका केली आहे. यावेळी राणे म्हणाले कि,उद्धव ठाकरेना काँग्रेस राष्ट्रवादीची भीती वाटते ते औषध देखील त्यांना विचारल्या शिवाय घेऊ शकत नाही ते काय औरंगाबादचे नाव बदलणार असे म्हणत उद्धव ठाकरे यांना औरंगाबाद येथील सभेच्या पार्श्वभूमीवर डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवरून हि मुख्यमंत्र्यांवर निशाण साधला आहे .मुख्यमंत्र्यांच्या आमदारांना लपवून ठेवावी लागते ही वेळ आली असे म्हणत एके काळी शिवसेनेच्या धाकाने इतर पक्षाचे आमदार पाळायचे आता यांचे आमदार पळत आहे. असे म्हणून उद्धव ठाकरे यांना हिणवण्याचा प्रयत्न केला आहे.

आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आमदार राणेंची टीका
आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असताना या पार्श्वभूमीवर आयोद्या मध्ये लहान मुलांना अलावूड आहे का ? असे म्हणत आमदार राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. ज्ञानवापीवर शिवसेनेनं आजवर भूमिका स्पष्ट केली नाही असे देखील राणे म्हणालेत ज्ञानवापीवर शिवसेनेनं अयोध्येत भूमिका स्पष्ट करावी असे हि सांगितले

नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर जहरी टीका
नितेश राणे यांनी नाशिक मध्ये राज्यसभा निवडणुकीवरून बोलताना संजय राऊतांवर निशाणा साधला आहे कडवट शिवसैनिक संजय पवार आहे संजय राऊत नाही संजय राऊत बाहेरून आला आहे संजय राऊत लोमट्या आहे. असे म्हणत संजय राऊतांवर चांगलीच जहरी टीका केली आहे. एवढ्यावरच न थांबता पुढे देखील संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत निर्लज्ज आहे त्याने बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नीच्या संबंधावर लेख लिहिला होता त्यांच्यात वाद आहे असा लेख लिहिणाऱ्या ला शिवसेनेचे आमदार मत देतीला का अशा प्रश्न देखील उपस्थित केला. सेफ मत संजय पवार यांना द्यावी तर राऊतला उर्वरित मत द्यावी असे देखील पत्रकारांशी बोलतां सांगितले या वेळी संजय राऊत ला लीलावतीला पाठविण्याची वेळ आली आहे असे देखील राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे.