नाशिककर, घाबरू नका! यंदा पाणीकपातीचे संकट नाही!

नाशिक । प्रतिनिधी
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात यंदा मुबलक प्रमाणात पाणी साठा असल्याने नाशिक शहराला पाणी कपातीचे संकट येणार नाही, असे चित्र आहे. मागच्या वर्षी शहरावर बपाणीकपातीचे संकट आले होते. तरी महापालिकेचे अधिकारी पाणी संदर्भात आढावा घेऊन निर्णय घेणार आहे.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मागच्या वर्षी कमी प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झालेला होता, यामुळे नाशिक शहरावर आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी घेतला होता.

मात्र यंदा नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य समजल्या जाणाऱ्या गंगापूर धरणात सुमारे 65 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे तर इतर धरणांमध्ये देखील मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने नाशिककरांवर यंदा पाणीकपातीचे संकट येणार नाही, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

दरम्यान लवकरच महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाणी याबाबत आढावा बैठक होणार आहे. यानंतर अंतिम निर्णय होणार असल्याचे समजते .