आता हनुमान जन्मभूमीवरून वाद.. हनुमानाचा जन्म नेमका कुठला.?

नाशिक: राम जन्मभूमीनंतर आता हनुमान (Hanuman) जन्मभूमीवरून (birthplace) वादंग (dispute) होतांना दिसत आहे. कारण हनुमानाच्या जन्म स्थळावरून महंत आणि साधू यांच्यातच मतमतांतर असल्याचे दिसत आहे. हनुमानाचं जन्मस्थान अंजनेरी (Anjaneri) नसून कर्नाटकातील (Karnatak) किष्किंधा (Kishkindha) असल्याचा दावा किष्किंधाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी केला आहे. अंजनेरी ही हनुमान जन्मभूमी असल्याचा दावा त्यांनी फेटाळला आहे. हनुमान जन्मभूमीवर शास्त्रार्थ आणि वादविवाद करण्यासाठी महंत गोविंद दास त्र्यंबकेश्वर (Tryambakeshwar) येथे आलेले आहेत. ते त्र्यंबकेश्वर मध्ये आंदोलन करत आहे. महंत गोविंद दास यांनी नाशिकच्या संत महंतांना अंजनेरी हनुमान जन्मभूमी असल्याचं सिद्ध करण्याचं आव्हान दिलं आहे.

किष्किंधाचे मठाधिपती गोविंद दास यांनी नाशिक (Nashik) मधील महंत, अभ्यासकांना खुलं आव्हान दिलं आहे. हनुमान यांचे जन्मस्थान किष्किंधा असून त्यांच्या जन्मस्थळाच्या संदर्भात कुठलीही चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाल्मिकी रामायणाचा दाखला देत किष्किंधा ही हनुमान जन्मभूमी असल्याचा दावा महंत गोविंद दास यांनी केला आहे.

राम जन्मभूमी, काशी येथील ज्ञानवापी मशिद आणि त्यानंतर आता पुन्हा हनुमान जन्मस्थळाचा वाद उफाळला आहे. किष्किंधा येथील मठाधिपती त्र्यंबकेश्वर येथे ठाण मांडून बसाले आहे. किष्किंधा हे हनुमान जन्म स्थान असल्याचा दावा ते करत आहेत.

काही दिवसांपूर्वी हनुमानाच्या जन्मस्थानावरून आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) आणि कर्नाटक (Karnatak) या राज्यांमध्ये देखील वाद निर्माण झाला होता. हनुमानाचा जन्म तिरुमलाच्या सात टेकड्यांमधील अंजनाद्री पर्वतात झाल्याचा दावा आंध्रप्रदेश मधील तिरुमला तिरुपती देवस्थानने केला होता. तर कर्नाटकच म्हणणं आहे की, हनुमानाचा जन्म हंपी जवळच्या किष्किंधा मधल्या अंजनाद्री इथे झाल्याचा दावा केला आहे.