‘..आता उरल्या सुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत ?’, पुन्हा ठाकरेंना डिवचलं

देशभरात झालेल्या पी एफ आय (PFI) वरील कारवायांविरोधात पी एफ आय संघटनेतर्फे आंदोलने झाली. या आंदोलनांदरम्यान देण्यात आलेल्या ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या (Pune Pakistan Zindabagh Declaration) घोषणा सध्या महाराष्ट्राचं राजकारण तापवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. पी एफ आय वर केलेल्या छापेमारीनंतर (Action of National Investigation Agencies on PFI) पी एफ आय कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी पुण्यात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या यावरून आता राजकीय वातावरण तापतंय अशात यावरून भाजपने नेते आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) यांनी आता उरल्या सुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरेंना (Udhhav Thackeray) डिवचलं आहे.

‘मर्द असल्याचे वारंवार जाहीर करणाऱ्या, हिंदुत्ववादी असल्याचा कांगावा करणाऱ्या, सतत संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करणारे, उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.


शेलारांचे ट्विट ; उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत?..ठाकरेंना डिवचले

पीएफआयचा देशविरोधी कट उघड, पुण्यात तर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा..मर्द असल्याचे वारंवार जाहीर करणाऱ्या…हिंदुत्ववादी असल्याचा कांगावा करणाऱ्या…सतत संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमितभाई शाह यांच्यावर टीका करणारे…उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत? इतिहासातील खानांची सदैव “उचकी” लागणारे भाजपाचा राजकीय कोथळा काढायला निघालेले..संकटे टळून गेल्यावर करुन दाखवलेचे “होर्डिंग” लावणारे आता पीएफआयवरील कारवाईचे समर्थन ही करायला तयार नाहीत…आणि पाकिस्तान झिंदाबादचा निषेध ही करत नाहीत! आता कुठल्या बिळात बसला आहात?- (ट्विट) आशीष शेलार, भाजप नेते.


राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशातील अनेक राज्यांमध्ये पीएफआय विरोधात कारवाई केली. या कारवाईविरोधात पीएफआयतर्फे अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली. पुण्यातही पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पण या आंदोलन पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. पोलिासांनी पीएफआयच्या ६० ते ७० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


शिवरायांच्या भूमीत असे नारे सहन केले जाणार नाहीत : मुख्यमंत्री

पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत(Such slogans will not be tolerated in Shiv Rai’s land: Chief Minister), असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.