Home » न्यूड फोटो शूट प्रकरण; रणवीर सिंगने पोलिस ठाण्यात येत नोंदवला जबाब

न्यूड फोटो शूट प्रकरण; रणवीर सिंगने पोलिस ठाण्यात येत नोंदवला जबाब

by नाशिक तक
0 comment

न्यूड फोटो शूट प्रकरणी बॉलीवूड सुपरस्टार रणवीर सिंग याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर मुंबई पोलिसांकडून काही दिवसांपूर्वी रणवीरला समन्स बजावण्यात आले होते. त्यांनतर आज रणवीर सिंगने चेंबूर पोलिस ठाण्यात येऊन आपला जबाब नोंदवला आहे. रणवीर सिंग आज (२९ ऑगस्ट) चेंबूर पोलिस स्टेशनमध्ये सकाळी ७ वाजता हजर झाला होता. यावेळी जवळपास दोन तास त्याची चौकशी आणि जबाब नोंदणी प्रक्रिया सुरु होती. यावेळी त्याची लीगल टीम देखील त्याच्या सोबत पोलीस स्टेशनला हजर होती.

काय आहे प्रकरण ?

रणवीर सिंगने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते, दरम्यान अनेकांनी त्याचावर आक्षेप घेतला तर अनेकांनी त्याला समर्थन देखील दिले होते मात्र, त्याच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी चित्रपट अभिनेता रणवीर सिंहवर मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रणवीर सिंहविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला गेला होता. रणवीर सिंहविरोधात आयपीसी कलम 292, 293, 509, ते कलम 67(ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून काही दिवसांपूर्वी रणवीरला समन्स बजावण्यात आले होते. रणवीर सिंगने दोन आठवड्यांची मुदत मागत आज चेंबूर पोलिस ठाण्यात येऊन आपला जबाब नोंदवला आहे. त्याने पोलिसांना त्यांच्या कामात सहकार्य केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

न्यूड फोटो शूट प्रकरण रणवीर सिंगच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याला या प्रकरणातून कधी दिलासा मिळेल हे सांगता येत नाही.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!