महापालिका वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अधिकारी लीना बनसोड यांचे गायन

नाशिक : महानगरपालिकेच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त (Fortieth Anniversary of Municipal Corporation) सुरांची उधळण झाली. मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Chandrakant Pulkundwar) यांनी गाणं गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमात आदिवासी विभागाच्या संचालक लीना बनसोड (Lina Bansod Director of Tribal Department) देखील उपस्थित होत्या आणि मनपा आयुक्तांनंतर त्यांनीही गीत गायलं. यावेळी लीना बनसोड यांनी ‘ही वाट दूर जाते’ हे गीत गाऊन उपस्थितांची उस्फूर्त दाद मिळवली.

महानगरपालिकेच्या चाळीसाव्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी गाजवला. या कार्यक्रमात नाशिक महापालिका आयुक्त आणि लीना बनसोड यांचा एक नवा अंदाज पाहायला मिळाला आहे. दोघांनीही भर सभागृहात गाणं गायलं. यावेळी आयुक्तांनी ‘सलामे इश्क मेरी जान’ या गाण्यावर तर लीना बनसोड यांनी ‘ही वाट दूर जाते’ या गाण्यावर सुर छेडले.

पहा व्हिडिओ

नाशिक महानगरपालिकेच्या चाळीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाची लीना बनसोड यांनी गीत गाऊन शोभा वाढवली. यावेळी ‘ही वाट दूर जाते’ हे गाणं गाऊन उपस्थितांची मन जिंकली. या कार्यक्रमात नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार सह मनपाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या चाळीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कालिदास नाट्यगृहात संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयुक्तांनी गायला सुरुवात करताच संपूर्ण कालिदास कला मंदिरात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर लीना बनसोड यांनी मैफिल सजवली, लीना बनसोड, मनपा आयुक्तांसह अनेक मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत कार्यक्रमाला रंगत आणली.