‘रोज डे’ प्रसंगी प्रेमासह गुलाबाच्या किमतींनाही भरती..!

Valentine week म्हंटल की प्रेमाला भरती येते. आता या वीकची सुरुवात आजपासून होत आहे. तर या वीकचा पहिला दिवस म्हणजे ‘रोज डे’चा. आज प्रेमी युगुल आपल्या जोडीदाराला गुलाब देऊन आपल्या जीवनात त्यांचे किती महत्व आहे हे सांगत असतात.

याच Valentine week मुळे गुलाब आणि इतर सुशोभिकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलांच्या किंमतीत जोरदार वाढ झाली आहे. फुलांचे भाव ४० ते ५० टक्के वाढले आहेत. प्रसिध्द दैनिकाने फुलांच्या किंमतीची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, लग्नसोहळे तसेच इतर कार्यक्रमांमुळे सजावटीच्या फुलांची मागणी वाढली होती. त्यात आता Valentine week आणि त्यातल्या त्यात रोज डे मुळे गुलाबाच्या किमती वाढल्या आहेत.

गुलाबाचे एक फुल साधारणपणे ४ ते ५ रुपयांना मिळते. पण आता व्हॅलेंटाईन आठवड्याने गुलाबाच्या फुलांना मागणी वाढली असून एका गुलाबाच्या फुलासाठी १५ ते २० रुपये मोजावे लागत आहे. हा भाव या आठवड्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी महिना आला की सुरू होते वॅलेंटाईन वीकची चर्चा. १ ते १४ फेब्रुवारी पर्यंत वॅलेंटाईन साजरा होतो. रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि व्हॅलेंटाईन डे या अनुक्रमाने हे सात दिवस ठरलेले असतात. रोज डे या वीकला सुरुवात होते.

त्यानुसार आज रोज डे आहे. तेव्हा आज आपल्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीला सांगण्यासाठी एकमेकांना गुलाबाचे फुल दिले जाते. फक्त गुलाबाचे फुल देणं हे या दिवसाचे वैशिष्ट्य नाही, तर वेगवेगळ्या भावनांनुसार वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबाचे फुल देण्याची एक अनोखी परंपरा या दिवशी असते. गुलाबाचे फुल वेगवेगळ्या रंगात आढळते. त्यामुळे ज्या रंगाचे फुल त्यानुसार देणाऱ्याच्या मनातल्या भावनांची ओळख आपण करू शकतो. अशी एक संकल्पना आहे. त्यानुसार लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे, पिवळं गुलाब मैत्रीचे प्रतीक आहे, नारंगी गुलाब उत्साहाचे प्रतीक आहे, गुलाबी गुलाब आभार..प्रशंसा आणि प्रसन्नतेचे प्रतिक आहे, पांढरे गुलाब पवित्र आणि निरागस नात्याचे प्रतीक आहे, पीच गुलाब सौंदर्य आणि विनम्रतेचे प्रतिक आहे, लवंडर गुलाब पहिल्या दृष्टीतील प्रेमाचं आणि वैभवाचे प्रतीक आहे, तर निळं गुलाब हे आपल्या क्रशसाठी दिलं जातं.