स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हर हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत चांदवड येथील पंचायत समिती येथे प्रांत अधिकारी चंद्रशेखर देशमुख व गट विकास अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनात चांदवड शहर ते गणुर गावापर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चांदवड शहरातील नागरिकांसह अधिकारी-कर्मचारी व शालेय विद्यार्थ्यांनी यांनी सायकल रॅलीत सहभाग नोंदवला.
आज सकाळी चांदवड येथील पंचायत समिती येथून या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये स्वतः प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख व गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी सायकल चालवून या स्पर्धेतील नागरिकांना उस्फुर्त साथ देत आपला सहभाग नोंदवला. यावेळी आलेल्या या वेळी ज्यांना सायकल रॅली शक्य नव्हती अशा लोकांनी चांदवड पंचायत समितीतील ते चांदवड येथील ऐतिहासिक अहिल्यादेवींचा रंग महाल इतपर्यंत हेरिटेज वाक अंतर्गत पायी रॅली काढून हर हर घर तिरंगा मोहिमेची जनजागृती केली. शासनातर्फे जनजागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याचे आदेश असून पंचायत समितीतर्फे आज रॅली काढून जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी गटविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व शिक्षक तसेच प्रायव्हेट शाळांचे शिक्षक तसेच चांदवड शहरातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.