डॉ. वाजेच्या खून प्रकरणातील अन्य संशयित गायब, पोलिसांकडून शोध सुरु

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमधील बहुचर्चित डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणाचे गूढ उकलले. त्यानंतर संशयित आरोपी संदीप वाजे यास अटकही करण्यात आली. मात्र अद्यापही या प्रकरणांतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. यातील संदीप वाजे यांच्यासह अन्य साथीदारांचा या प्रकरणात समावेश असल्याचे पुढे आले. मात्र काही दिवस उलटून गेलं तरीही अद्याप हे साथीदार गायब असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

कौटुंबिक कलह अन त्यातून वारंवार होणाऱ्या भांडणातून मनपाच्या सिडको रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्ण वाजे यांचा त्यांचा पती संदीप वाजे यानेच कात रचून हत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर काही तासांतच संदीप वाजे यास अटकही करण्यात आली.

या गुन्ह्यात संदीप वाजेसह त्याच्या अन्य पाच साथीदारांचाही समावेश असल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस संदिप वाजेच्या अन्य साथीदारांचा शोध घेत असल्याची माहिती आहे.

डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी संदीप वाजे यांच्यासह डॉ. सुवर्णां यांच्या नातेवाईकांचेही जाबजबाब नोंदवण्यात आले असून यात डॉ. सुवर्णा वाजे यांच्या नातेवाईकांनी संदीप वाजे यांच्यावरच संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी वाजे यांच्या संपर्कात असलेल्या काही संशयितांना तपास सुरु केला आहे. दरम्यान तपासात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत असून पोलिसांनी काही जणांवर नजर ठेवल्याचे समजते.