माणुसकीला काळिमा फासणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. नातवाने मुलीला पळवून नेल्याचा आरोप करत वृद्ध महिलेला विवस्त्र करत बेदम मारहाण केली आहे. महिला आक्रोश करत होती मला सोडून द्या! मारू नका.. मात्र नराधमांनी ऐकले नाही. आणखी संतापजनक म्हणजे घटनेचा व्हीडीओ काढत सोशल मिडियावर देखील व्हायरल करण्यात आला. घटना औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील हा धक्कदायक प्रकार आहे. या घटनेने राज्याचे लक्ष ओढले असून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर फाट्यावर असलेल्या पारधी वस्तीवर राहत असलेल्या एका वृद्ध महिलेसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही महिला एकटीच आपल्या नातवासोबत येथे राहते. मात्र अचानक काही इसम तिथे पोहोचले. त्यात ओझर गावातील विवेक पिंपळे ह्या संशयिताने त्या वृद्ध महिलेस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
मोठ्याने अकांड-तांडव करत, तुमच्या नातूने आमची मुलगी पळून नेल्याचा आरोप केला व महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या वृद्ध महिलेला तिच्या घरातून बळजबरीने ओझर गावात नेले. गावातील पारधी वस्तीवर महिलेला विवस्त्र करत बेदम मारहाण केली.
महिलेने आपल्याला सोडून देण्यासाठी आर्जव केला. आक्रोश केला. दयेची भिक मागितली मात्र नराधमांची क्रूरता वाढतच होती. आणि त्या वृद्ध महिलेला मारहाण करतच सुटले.
घडलेला सर्व प्रकार या नराधमांनी व्हिडीओ मध्ये कैद केला व सोशल मिडीयावर व्हायरल केला. या गंभीर प्रकरणाची दखल गंगापूर पोलिसांनी घेतली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेमुळे सोशल मिडीयावर संताप व्यक्त करण्यात आला असून नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. घटनेमुळे माणुसकीला काळिमा फासण्यात आला असून याप्रकरणी पोलीस कडक पाऊल उचलणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.