कोहलीच्या खराब फॉर्मसाठी पाकिस्तानच्या खेळाडूने केली ‘दुवा’

भारत-पाकिस्तान हे पारंपरिक विरोधी संघ आहेत. दोन्ही टीमचे फॅन्स वर्ल्डकप ट्रॉफीपेक्षाही ही मॅच महत्त्वाची समजतात. त्यामुळे भारत-पाकिस्तान या क्रिकेट सामन्याची सर्वांनाच आतुरता असते. अशात आशिया कप २०२२ चा भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना २८ ऑगस्टला रंगणार आहे. या सामन्यात विराट कोहलीचा फॉर्म अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. गेल्या वर्षाच्या पराभवानंतर भारत पहिल्यांदाच पाकिस्तान संघाचा सामना करणार आहे. अशात विराट कोहलीच्या फॉर्म बद्दल पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.

विराटच्या खराब फॉर्म बद्दल सध्या अनेकांकडून टीका होत आहे. अशात पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने विराटवर टीका करणाऱ्यांना सुनावलं. तो म्हणाला सोशल मीडियावर चाहते व मीडियाकडून विराटवर होणारी टीका चुकीची आहे. तो ऑल टाईम ग्रेट खेळाडू आहे. तो अजून ३३ वर्षांचा आहे आणि मला खात्री आहे, तो जबरदस्त कमबॅक करेल. पण, त्याचे हे कमबॅक पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत होऊ नये, अशी आशा करतो. असं विधान वसीम अक्रम याने केला आहे. त्यामुळे विराटच्या विराट खेळीचा दरारा त्याच्या खराब फॉर्म नंतरही पाकिस्तानच्या संघात कायम असल्याचं दिसून येत आहे.

विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये असताना त्याने पाकिस्तान संघाची उडवलेली दाणादाण अजूनही पाकिस्तानी खेळाडू विसरले नसल्याचे वसीम अक्रम याने केलेल्या या विधानानंतर दिसून येत आहे.