Home » उद्या बोट मोडाल,परवा बोट तोंडात घालाल; पवारांना मनसे आमदार राजू पाटील असे का म्हणाले?

उद्या बोट मोडाल,परवा बोट तोंडात घालाल; पवारांना मनसे आमदार राजू पाटील असे का म्हणाले?

by नाशिक तक
0 comment

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी विधीमंडळात बोटावर मोजण्याइतपतही आमदार निवडून आणता येत नाही, त्या पक्षाबाबत काय भाष्य करायचं, ह्या शब्दांत मनसेवर बोचरी टीका केली होती त्यावरून मनसेने देखील पलटवार केला असून पवारांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी मनसेच्या शैलीत उत्तर दिले असून त्यांचा ट्वीटची चर्चा होत आहे.


राजू पाटील म्हणाले,

शरद पवारांच्या टीकेला उत्तर देताना राजू पाटील यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा….बोटं तोंडात घालाल. आम्ही ‘धन’से कमी आहोत, पण ‘मनसे’ लई आहोत. #मौका_सभी_को_मिलता_हैआदर देतोय, आदर घ्या. असा इशारा दिला आहे.

पहा मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्वीट

शरद पवार म्हणाले होते,

शिवसेना ही शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातील मांजर बनली आहे. दसरा मेळाव्यातही शरद पवारांचेच विचार मांडले जातील, अशी खोचक टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली होती. त्यावर प्रश्न विचारला असता पवारांनी ज्यांना विधीमंडळात बोटावर मोजण्याइतपतही आमदार निवडून आणता येत नाही, त्या पक्षाबाबत काय भाष्य करायचे, असे विधान केले होते. आता पवारांच्या या टीकेला आमदार राजू पाटील यांनी मनसेच्या स्टाईलने उत्तर दिले असून आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!