Home » पठाण हाउसफुल्ल; बरेच विक्रम मोडणार असल्याचा अंदाज..!

पठाण हाउसफुल्ल; बरेच विक्रम मोडणार असल्याचा अंदाज..!

by नाशिक तक
0 comment

बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान याचा पठाण हा बहुचर्चित चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने दमदार फॉर्म दाखवला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम रचले. दरम्यान आज या चित्रपटाला रिलीज होऊन आठवडा उलटून गेला आहे. आठव्या दिवशी देखील चित्रपटाची ताबडतोड कमाई सुरु आहे.

या सात दिवसांत जगभरात पठाण ने ६३४ कोटींची दमदार कमाई केली आहे. देशातील कमीच आकडा पहिला तर देशात पठाण ने ३४९.७५ कोटींची कमाई केली आहे. या कमाईसह पठाण हा देशात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सहभागी झाला आहे. ‘पठाण’ने पहिल्याच दिवशी जवळपास ५४ कोटी रुपयांची कमाई केली होती. ताबडतोड कमाई करत पठाण चित्रपटाने ‘बाहुबली’ आणि ‘केजीएफ २’ सारख्या सुपरहिट चित्रपटांना देखील माघारी सोडलं आहे.

‘पठाण’ने पहिल्याच दिवशी जवळपास ५४ कोटी रुपयांची कमाई केली असून आठव्या दिवशी ही कमाई देशात ३४९.७५ कोटींवर पोहचली आहे. तर हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. यशराज फिल्म्स निर्मित, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शन या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या भूमिका आहेत.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७.०५ करोडची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ७०.०५ कोटींची, तिसऱ्या दिवशी ३९.२५ कोटींची, चौथ्या दिवशी ५१ कोटींची, पाचव्या दिवशी ६०.७५ कोटी रुपयांची, सहाव्या दिवशी २५ कोटींची, सातव्या दिवशी २० ते २२ कोटींची आणि आठव्या दिवशी १८ ते १९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर येत्या काही दिवसांत ‘पठाण’ हा बॉक्स ऑफिसवरील इतरही बरेच विक्रम मोडणार असल्याचा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!