Pathan Movie|’पठाण’चा ताबडतोड परफॉर्मन्स

सुरुवातीला ‘बेशरम रंग’ या गाण्यातील वेशभूशेवरून वादात राहिलेला पठाण चित्रपट अखेर काल प्रदर्शित झाला. चित्रपट आधी वादावरून चर्चेत आला तर आता कमाईवरून चर्चेत येत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम रचले आहेत. शाहरुखसोबतच दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या भूमिका असणारा हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे.

बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान याचा पठाण हा बहुचर्चित चित्रपट काल (२५ जानेवारी) प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम रचले. ‘पठाण’ने पहिल्याच दिवशी जवळपास ५४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ताबडतोड कमाई करत पठाण चित्रपटाने ‘बाहुबली’ आणि ‘केजीएफ २’ सारख्या सुपरहिट चित्रपटांना देखील माघारी सोडलं आहे.

‘पठाण’ने पहिल्याच दिवशी जवळपास ५४ कोटी रुपयांची कमाई केली असून हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. यशराज फिल्म्स निर्मित, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शन या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या भूमिका आहेत.