माझी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची संवाद साधला यावेळी नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयात मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या असून येणाऱ्या काळात पक्षसंघटना अधिक मजबुत करण्यासाठी काम करायचे आहे. प्रत्येक तालुका,गावे, शहर आणि वॉर्डावॉर्डातील बूथ कमिट्या मजबूत करून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करा असे आवाहन भुजबळ यांनी केले.
सत्ता असो वा नसो शरदचंद्र पवार साहेब यांचे नेतृत्व अखंडितपणे उच्चस्तरावर राहील असे देखील यावेळी प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. तसेच पुढे म्हणाले की, आता आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. ती म्हणजे अधिक अधिक लोक आपल्यासोबत जोडून घेण्याची. सरकार पडताना अनेक आरोप प्रत्यारोप झाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. पण मला त्यांना सांगायचे आहे. की ‘बड़ी से बड़ी हस्ती मिट गई हमें मिटाने में, तुम चाहे कितनी भी कोशिश करलो, तुम्हारी उम्र बीत जाएगी हमें झुकाने में’ या शायरीद्वारे विरोधकांवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मजबूत झाली आहे.सत्ता असली काय आणि नसली काय. जनतेच प्रेम आमच्यावर नेहमी आहे. हे कधी तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाशिक शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज राष्ट्रवादी भवन नाशिक येथे छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी यावेळी विधानसभेचे माझी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे देखील उपस्थीत होते . यावेळी बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करण्याच्या प्रयत्न केला आहे. कोरोनाचा कालावधी असतांना नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ साहेबांनी सातत्याने तालुकावार व जिल्हावार बैठका घेऊन यशस्वी नियोजन केले. रेशनच्या माध्यमातून अन्न, धान्याचा मोफत मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले. गेल्या अडीच वर्षांच्या काळात अनेक महत्वपूर्ण निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून घेतले. कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. जिल्हा नियोजनचा ५६७ कोटींचा निधी थांबविण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला आहे. हे सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे पैसे आहे. ते कोणीही रोखू शकत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या आढावा बैठकित माझी मंत्री छगन भुजबळ नरहरी झिरवाळ, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे,आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार सरोज आहिरे, माजी खासदार देविदास पिंगळे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, माजी आमदार जयवंतराव जाधव, शिवराम झोले,डॉ.सयाजीराव गायकवाड,अशोक सावंत, निवृत्ती अरिंगळे, ऍड.शिवाजी सहाणे, सचिन पिंगळे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, शहर सरचिटणीस संजय खैरनार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.