३१ मे रोजी पेट्रोल पंप चालकांचे आंदोलन; कर कपातीविरोधात आक्रमक..

नाशिक : राज्यातील पेट्रोल (petrol) पंप चालकांनी केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल वरील अबकारी कराच्या कपाती विरोधात ३१ मे रोजी आंदोलन पुकारलं आहे. या दिवशी पेट्रोल डिझेल वेल्फेअर (welfare) असोसिएशन (association) कडून ‘नो पर्चेस आंदोलन’ करण्यात येणार आहे. डिलर्सचे कमिशन (commision) वाढवून मिळावे, या मागणीसाठी हे आंदोलन (protest) करण्यात येणार आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातही पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. यामुळे पेट्रोल डिझेल ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात क्रमशः ८ आणि ६ रुपयांची कर (tax) कपात केली होती. त्यांनर राज्य सरकारनेही कर कपात केली होती. पण केंद्र आणि राज्य सरकारनेही चुकीच्या पद्धतीने कर कपात केल्याचा आरोप पेट्रोल पंप चालकांकडून करण्यात आला आहे. या विरोधात पेट्रोल डिझेल वेल्फेअर असोशिएन कडून ‘नो पर्चेस आंदोलन’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मे रोजी, तेल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पेट्रोल पंप डिलर्स असोशिएशन यांनी म्हटलं आहे की, नुकतेच सरकारकडून पेट्रोल-डिझेल वरील अबकारी कर कमी करण्यात आल्याने पेट्रोलच्या किंमतीत घट झाली आहे. यामुळे पेट्रोल पंप चालकांना नुकसान झाले आहे. पेट्रोल पंप चालकांनी जास्त किंमत देऊन इंधनाची खरेदी केली होती. पण आता कर कपात झाल्याने पेट्रोलचे दर कमी झाले आहे. त्यामुळे आता अगोदरचा साठा खरेदी केलेल्या किंमतीपेक्षा कमी किंमतीत विकावा लागत आहे. त्यामुळे डिलर्सचे कमिशन वाढवून मिळावे यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. मात्र, या आंदोलनाचा ग्राहकांना कोणताही फटका बसणार नाही, असं पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनने म्हटले आहे.