BY- REVATI WALZADE
नाशिक- “पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया” ( पी.एफ.आय.) या संस्थेतील सातव्या संशयिताला एनआय व महाराष्ट्र एटीएसने अटक केली होती. या संशयिताला (दि.२८) जिल्हा नायाधीशानी ए.यु.कदम.यांनी न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
“पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया” हि एक कट्टर इस्लामिक संघटना आहे. मागास आणि अल्पसंख्याकाच्या अधिकारासाठी काम करणारी संस्था अशी स्वतः ची ओळख ते सांगतात. पण देशामध्ये अनेक ठिकाणी झालेल्या दंगली मागे या संघटनेचे कनेक्शन असल्याचे आढळून आलेले आहे. पी.एफ.आय. ची निर्मिती १९९३ साली स्थापना झालेल्या नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंटमधून झाली. १९९२ साली बाबरी मशिद पाडल्यानंतर नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट नावाच्या संघटनेची स्थापना झाली होती. २००६ साली ही फ्रंट पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियामध्ये विलिन झाली. अधिकृतपणे या संघटनेची सुरुवात १७ फेब्रुवारी २००७ रोजी झाली. याचे संपूर्ण नियंत्रण केरळमधून होते. असे असले तरी त्यांचे नेटवर्क संपूर्ण देशभरात आहे.
इरफान दौलत खान नदवी (वय ३५) असे पी.एफ.आय. च्या सातव्या संशयिताचे नाव आहे. सप्टेंबर महिन्यात एकाच वेळी “पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया” च्या संशयित सदस्यांची धरपकड दहशतवादीविरोधी पथकाने व महाराष्ट्र एटीएस ने केली होती. मालेगावातून रविवारी (दि.१३) “पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया” चा सातवा संशयित मौलाना इरफान याला एटीएस ने अटक केली होती. जिल्हा न्यायालयाने त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली होती. दरम्यान २८ नोव्हेंबर रोजी कोठडीचा कालावधी संपल्याने त्याला पुन्हा न्यायालया समोर हजर करण्यात आले. (दि.२८) जिल्हा नायाधीश ए.यु.कदम.यांनी मौलाना इरफानला न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
एटीएस ने यापूर्वी अटक केलेल्या ६ संशयितंसोबत मौलाना इरफान हा संपर्कात होता. संशायीतांसोबत त्याने ५०० वेळा, व उर्वरित ईतर पी.एफ.आय. च्या सदस्यांशी ६०० वेळा संपर्क केल्याचे समोर आले आहे. २००९ सालापासून खान हा पी.एफ.आय.चा समन्वयक म्हणून काम करत होता. नुपूर शर्माच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलना पासून इरफान वर दहशतवादीविरोधी पथकाची नजर होती. मालेगावातून आत्तापर्यंत २ पी.एफ.आय. संशयितांना अटक करण्यात आली आहे.