Home » आंदोलनादरम्यान झळकले ‘औरंगजेबाचे’ फोटो; अखेर जलील यांनी भूमिका केली स्पष्ट

आंदोलनादरम्यान झळकले ‘औरंगजेबाचे’ फोटो; अखेर जलील यांनी भूमिका केली स्पष्ट

by नाशिक तक
0 comment

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर या नामांतरावरून छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाजली यांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र त्यांच्या आंदोलनात दरम्यान औरंगजेबाचा फोटो झळकवण्यात आला आणि त्यावरून वातावरण तापलं. या संदर्भात जलील यांनी आपली भूमिका मांडली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून साखळी आंदोलन करत आहेत. औरंगाबादच्या नामांतरणाला त्यांनी विरोध केला आहे. त्यासाठीच त्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान त्यांच्या या साखळी आंदोलनात औरंगजेबाचा फोटो झळकावण्यात आल्याने वाद निर्माण झाला. मात्र जलील यांनी या प्रकाराचे समर्थन केले नाही. विविध पक्षांकडून जलील यांच्यावर टीका केली गेली. या सर्व घडामोडी दरम्यान ‘औरंगजेब आमच्यावर का लादत आहात..?’ असा थेट सवाल इम्तियाजली यांनी केला आहे.

इम्तियाज जलील पुढे बोलताना म्हणाले की ‘आम्हाला औरंगजेबासोबत काही घेणं देणं नाही. त्याचा आणि आमचा काही संबंध नाही. जसं शहराचं नामांतरण आमच्यावर लादलं. तसा औरंगजेब आमच्यावर का लाद्ताय..? असा सवाल त्यांनी केला आहे. शिवाय औरंगजेबाची कबर जिथे हलवायची तिथे हलवा. त्याच्या कबरीबाबत आम्हाला विचारताय की सांगताय हेच आम्हाला कळायला मार्ग नाही. असे देखील इम्तियाज जलील यांनी म्हंटले आहे.

‘औरंगाबाद’ शहराचे नाव बदलून ते छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्र सरकारने मजुरी दिली. या निर्णयाचे एकीकाकडे जोरदार स्वागत करण्यात आले. नाशिक शहरासह राज्यभरात ‘छत्रपती संभाजीनगर’नाव देण्यात आल्याने जल्लोष करण्यात आला. मात्र दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये या निर्णयाला विरोध होत आहे. एम आय एम कडून हा विरोध केला जात असून खासदार जलील या निर्णयाविरोधात साखळी आंदोलन करत आहे. त्याच दरम्यान औरंगजेबाचे फोटो या आंदोलनात दिसून आल्याने त्याला नवे वळण मिळाले आणि हा सर्व गदारोळ सुरु झाला. या दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातून औरंगाबादचीई कबर हलवायची असे वक्तव्य आमदार संजय शिरसाठ यांनी केले. या गदारोळादरम्यान इम्तियाज जलील यांनी आपल्वी भूमिका मांडली आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!