गोपीचंद पडळकरांनी लिहिलेल्या पत्रातून पवारांवर जहरी टिका

नाशिक | औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कायमच टीकास्त्र चालत असल्याचं आपण पाहिलंय वेळेवेळी भाजपने संभाजीनगरच्या नामांतरच्या मुद्यांवरून शिवसेनेवर टीका करत नामांतर कधी करणार असा जाब देखील विचारला आहे .एकीकडे औरंगाबादचं संभाजीनगर नामांतरण करण्याचं राजकारण तापत असताना आता दुसरीकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर चे नाव अहील्यानगर करण्याची मागणी केली आहे. या मागणीचे पत्र देखील पडळकर यांनी मुख्यांनंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

काय लहीलय पत्रात !
या पत्रात हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे अहमदनगर नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावी अशी तमाम अहील्याप्रेमिंची लोकभावना आहे . त्यामुळे आपण आता कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणारा हात मोगलशाही की होळकरशाहीचा ? असा प्रश्नकरत अहिल्यानगरी नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोल वर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल हि अपेक्षा अन्यथा हा बहुजन जागा झालाय आणि संघटित झाला आहे हे लक्षात ठेवा असा सूचक इशारा देखील या पत्रातून देण्यात आला आहे .

पत्रातून पवारांवर जहरी टीका
गोपीचंद पडळकर हे शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे कायमच चर्चेत राहिले आहेत. पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.अहमदनगर च्या चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना जाण्यापासून पोलिसांनी रोखले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहमदनगरच्या नामांतराच्या संदर्भात लिहिलेल्या पत्रात पवारांवर टीका करत म्हटले की अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती मध्ये पवार आजोबा नातवाच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबईबॉम्ब ब्लास्टचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते मा. शरदचंद्र पवार यांना हिंदु राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॉन्च करण्याचा इव्हेंट वाटतो अशी टीका या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान गेल्या अनेक वर्ष्यांपासून औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याच्या मुद्यांवरून भाजप आणि शिवसेने राजकारण केले मात्र या दोन्ही पक्षांनी हा मुद्दा तडीस नेला नाही विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांची सत्ता असताना देखील हा प्रश्न असाच प्रलंबित ठेवला संभाजी नगरचा मुद्दा प्रलंबित असतांना आता भाजपच्या आमदारांनी अहमदनगरच्या नामांतराची मागणी केलीये.आता अहमदनगरचे नामांतर होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे येत्या काळात नामांतराच्या मुद्यांवरून नक्कीच राजकारण तापणार अशी शक्यता नाकारता येत नाही.