मोठी बातमी! पोलीस आयुक्त दीपक पांडेय खासदार संजय राऊत यांच्या भेटीला

नाशिक | प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले पोलिस आयुक्त दीपक पांडेय थेट खासदार संजय राऊत यांच्या गेल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

महसूल विभागाविरोधात सनसनाटी पत्र लिहून थेट महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची नाराजी ओढावून घेणारे नाशिकचे (Nashik) पोलीस आयुक्त (Police Commissioner) दीपक पांडेय यांना गृहविभागाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. त्यामुळे लेटर बॉम्ब चांगलाच चर्चेत आला आहे.

दरम्यान या प्रकरणावरून पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी चौकशी सुरू केली असून ते शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेटीला गेल्याची माहिती आहे.

त्यातच पांडे यांनी मुंबईत बदलीसाठी गृहविभागाला अर्ज केला आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. संजय राऊत आणि दीपक पांडे यांच्या सलोख्याचे संबंध असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही भेट महत्वपूर्ण असणार यात शंका नाही.