आंदोलनाला सहकार्य न केल्यास रक्तरंजित संघर्षाला तयार राहा: स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस तोड बंद आंदोलन पुकारण्यात आले असून या आंदोलनाला कारखान्यांनी सहकार्य न केल्यास रक्तरंजीत संघर्षाला तयार राहण्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे. गेल्या वर्षी तोडलेल्या उसाला एफआरपीपेक्षा अधिकचे प्रतिटन २०० रुपये मिळावेत, साला एकरकमी एफआरपीपेक्षा अधिकचे प्रतिटन ३५० रुपये मिळावेत, साखरेची आधारभूत किंमत ३१ रुपयांवरून ३५ रुपये करा अश्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाणार आहे.

संघटनेच्यावतीने आंदोलन पुकारलाय

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यात गुरुवारी (ता. १७) व शुक्रवारी (ता. १८) या कालावधीत ऊसतोड बंद आंदोलन करण्यात येणार आहे. ऊस उत्पादकांनी ऊसतोड बंद ठेवावी. उसाची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिले आहे. तसेच या आंदोलनाला कारखान्यांनी सहकार्य न केल्यास रक्तरंजीत संघर्षाला तयार राहण्याचा इशारा देखील संदीप जगताप यांनी दिला आहे.

या आहेत मागण्या

गेल्या वर्षी तोडलेल्या उसाला एफआरपीपेक्षा अधिकचे प्रतिटन २०० रुपये मिळावेत. यावर्षी तोडणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपीपेक्षा अधिकचे प्रतिटन ३५० रुपये मिळावेत. साखरेची आधारभूत किंमत ३१ रुपयांवरून ३५ रुपये करा. काटामारी कायमची बंद होण्यासाठी उपाययोजना करावी. इथेनॉलच्या किमतीत पाच रुपयाची वाढ करावी. दोन साखर कारखान्याची हवाई अंतराची अट काढून टाकावी. ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या ऊस तोडणी महामंडळाकडून पुरविण्याचा निर्णय घ्यावा. मुकादम पद्धती बंद करावी, या मागण्यासाठी हे दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन होणार आहे, असे बांगर यांनी सांगितले.