राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार; नाशकात रोहित पवारांचे मोठे विधान

नाशिक : मध्यावधी निवडणुका कधी लागतील, हे मला माहीत नाही. मात्र येत्या काही महिन्यांत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असे मोठे विधान रोहित पवार यांनी नाशिकमध्ये केले आहे. लोकांच्या विरोधानंतर राज्यपालांना बदलण्यात आले. तर येत्या काही महिन्यात राष्ट्रपती राजवट राज्यावर लागू शकते का, असा प्रश्न लोकांच्या मनात असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. भाजपा स्वतःकडे पावर ठेवण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता आहे. असे विधान रोहित पवार यांनी केले आहे.

या मुद्द्यावर पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, ‘येत्या निवडणुकीत भाजपची पीछेहाट होईल, हे लोकांचे मत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता आहे. नवीन राज्यपाल आल्याने राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता, माझे वैयक्तिक मत आहे. दरम्यान रोहित पवार यांच्या या विधानाने चर्चा सुरु झाल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या नवीन नामकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही तेव्हाच स्वागत केलं होतं. महाविकास आघाडीत तेव्हाच निर्णय घेतला होता. आम्ही याचेही स्वागत करतो.’ असे ते म्हणाले. तर दुसरीकडे अहमदनगरच्या अहिल्यानगर नामांतरणाच्या विषयावरही ते बोलले. गोपीचंद पडळकर यांनी याबाबत ट्वीट केले. त्यावर रोहित पवार म्हणतात ‘अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म माझ्या मतदारसंघात झाला. याबद्दल लोकांचे मत जाणून घेतले पाहिजे. राजकारण न करता सर्व जण एकत्र आले पाहिजे. पण फक्त नामांतर हा विषय न घेता, इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहे.

पोटनिवडणूकीत भाजप पैशाचा वापर..?

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपने पैसे वाटप केल्याचे आरोप होत आहेत. त्यावर बोलताना ‘लोकांमध्ये तशा चर्चा आहे. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले आहे. सर्व महत्त्वाचे नेते तिथे व्यस्त आहे. निधीचा वापर मतांचे विभाजन करण्यासाठी होतो आहे. असे ते म्हणाले.

कांदा दर घसरण; याला राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार : रोहित पवार

सध्या कांद्याचे दर घसरत असून याला याला राज्य आणि केंद्र शासनाचे धोरण जबाबदार असल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. नाफेडने कांद्याची खरेदी करावी, पण नाफेडला पत्र देणं, हे राज्य सरकारचे काम आहे. मात्र त्यांचे नेते निवडणुकीत व्यस्त आहे आणि याला राज्य सरकार जबाबदार आहे आणि केंद्र सरकार देखील निर्यातीच्या धोरणाला जबाबदार आहे. असे रोहित पवार म्हणाले आहे.