#BREAKING : शिवतीर्थावर पाळणा हलला! राज ठाकरे झाले ‘आजोबा’

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजोबा झाले आहेत. राज ठाकरे यांच्या सूनबाई आणि अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. त्यामुळे शिवतिर्थावर सध्या आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, मिताली ठाकरे आणि बाळ सुखरूप असल्याचं प्राथमिक माहिती आहे.

शिवतीर्थावर नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याने ठाकरे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मुंबईत राज ठाकरे यांच्या नातवाचा जन्म झाला आहे, राज ठाकरे यांच्या सुनबाई मिताली यांचे सासर आणि माहेर दोन्हीही मुंबईतच आहे. त्यामुळे दोघंही कुटूंब नातवाचे तोंडसुख घेत आहेत.

अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचे २०१९ साली लग्न झाले होते. त्या दरम्यानच अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले होते. आता त्यांना एक वडील म्हणून तर राज ठाकरे यांच्यावर आजोबा म्हणून नवी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.