Home » राज ठाकरेंनी वेठबिगारीच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले; म्हणाले, नाशिक…

राज ठाकरेंनी वेठबिगारीच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले; म्हणाले, नाशिक…

by नाशिक तक
0 comment

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहेमीच सामाजिक प्रश्नांवरून सरकार ला खडबडून जागे करण्याचा प्रयत्न करत असतात आता त्यांनी पुन्हा एकदा ऐरणीवर आलेल्या वेठबिगारीवर सरकारचे लक्ष खेचून आणायचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात वेठबिगारीचे प्रकरण समोर आली होती. त्यावरून राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला असून यावर राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत अशी मागणी केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट व्हायरल होत असून चर्चेत आहे.


राज ठाकरे काय म्हणालेय?

गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत.

नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही.

राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं.

पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे, आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी. असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांत तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच. पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील. ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा.

इगतपुरीच्या घटनेने वेठबिगारीवर प्रकाश

महाराष्ट्रा सारख्या प्रगत राज्यांमध्ये वेठबिगारीच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले असून तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबत आज फेसबुकवर एक पोस्ट लिहीली असून तत्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे. त्यामुळे आता सरकार राज यांच्या मागणीवर काय भुमीक घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल. काही दिवसांपूर्वी इगतपुरी परिसरातील लहान मुलीच्या मृत्यूने वेठबिगारीचा उद्यावर पुन्हा प्रकाश पडला होता.

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!