राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत केल्यात महाराष्ट्रसैनिकांना पात्रातून ‘या’ सूचना

नाशिक | गेल्या अनेक दिवसापासून राज ठाकरे (Raj thakre ) यांनी भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून राज्यासह देशात मशिदीवरील भोंग्यांचा विषय चर्चेत राहिला आहे . भोंग्यांवरून राजकीय वातारण (Atmosphere )देखील ढवळून निघाल्याचे पाह्यला मिळाले त्यानंतर मनसे (Nms )अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंग्यांच्या बाबतीत पत्र (Letter ) लिहल्याचे पहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना एक पत्र (Letter) लिहीत पत्रातून एक सूचना केली आहे .भोंग्यांच्या विषय ( Subject)आपल्याला कायमचा संपवायचा आहे, त्यासाठी कामाला लागा असं राज ठाकरे यांनी या पात्रात म्हटलं आहे.

हे पत्र मनसैनिकांनी घराघरात पोहचवावे असे देखील पात्राच्या माध्यमातून सांगितले आहे. भोंगे ( Loudspeaker )हटवा हे आंदोलन थांबलेलं नसून आपणा सर्वांच्या आशीर्वादाने हे आंदोलन (Movement)चालूच राहील . या आंदोलनाला तुमचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभारही असायलाच हवा अशा उल्लेख असून. एक सुजाण नागरिक (Citizen)म्हणून पुढील सूचनांचे पालन आपण केले तर भोंग्यांचा हा प्रश्न आपल्याला कायमचा निकाली काढता येईल . असे म्हटले आहे.

काय आहेत पात्रात सूचना

१. सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकरच्या आवाजाची सांगितलेली मर्यादा लोकवस्ती असलेल्या भागासाठी म्हणजे तुम्ही आम्ही राहतो त्या परिसरासाठी जास्तीत जास्त ४५ ते ५५ डेसिबल ( स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मिक्सरचा आवाज ) इतकी आहे . तुमच्या घराजवळच्या लाऊडस्पीकरचा आवाज इतकाच असला पाहिजे . जिथे जिथे या नियमाचे पालन होत नसेल तिथे तिथे तुम्ही स्वाक्षरी मोहीम राबवून स्थानिक पोलीसांना कळवावे . लक्षात असू द्या की , तुम्ही जेव्हा अशा प्रकारची गोष्ट पोलिसांना कळवता तेव्हा तुम्ही लाऊडस्पीकरशी संबंधित लोकांविरोधात तक्रार करत नसता किंवा गुन्हा दाखल करत नसता . तुम्ही फक्त कळवत असता आणिसंबंधितांवर राज्यशासनाच्या ( State ) वतीने पोलीस गुन्हा दाखल करत असतात आणि पुढील कार्यवाही करण्याची जबाबदारी पोलिसांचीच असते . तुम्ही कळवल्यानंतरही पोलिसांकडून कायद्याचे पालन झाले नाही तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर न्यायालयाचा अवमान ( Contempt of Court ) केल्याचा ठपका लागू शकतो .

२. लाऊडस्पीकरच्या आवाजाचा त्रास झाल्यास तुम्ही घरातूनच स्वतःच्या मोबाईलवरून १०० क्रमांक डायल करू पोलिसांना सतत माहिती देऊ शकता . पोलिसांना ट्विटर आणि फेसबुकवर टॅग करूनही तुम्ही ही माहिती देऊ शकता . कोणत्याही प्रकारे तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली तर त्या तक्रारीची नोंद स्वतःकडे ठेवायला विसरू नका .

३. सर्वात महत्वाचं . माझं हे पत्र घेऊन तुमच्या घरी येणारा माझा जो महाराष्ट्र सैनिक आहे , त्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा . कोणत्याही संकटात , अडीअडचणीच्या वेळी माझा हा महाराष्ट्र सैनिकच तुमच्यासाठी धावून येईल . आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की , महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाई , शेतकरी आत्महत्या , अपुऱ्या शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा अशा अनेक प्रश्नांमुळे गोंधळ उडालेला आहे . पेट्रोल – डिझेलचे गगनाला भिडलेले भाव आणि महागाई यांमुळे तर जनता होरपळली आहे . बेरोजगारीचा प्रश्न तर दिवसेंदिवस राक्षसीरूप धारण करताना दिसत आहे . हे सर्व प्रश्न गंभीर आहेतच ; पण त्याचबरोबर आपल्या मानसिक आणि सामाजिक शांततेचा विषयही तितकाच महत्वाचा आहे , हे विसरून चालणार नाही . जसा हा भोंग्यांचा विषय आपण सर्वांनी मिळून सोडवला तसेच हे इतर प्रश्नही आपण हातात हात घालून एकत्रितपणे सोडवू , असा मला विश्वास आहे .

अश्या सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लहिलेल्या पत्रात केल्या आहेत.

पत्रात योगी आदित्यनाथांचाही उल्लेख
मनसे अध्यक्ष्य राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या बाबतीत घेतलेल्या भूमिकेनंतर बऱ्याच वेळा योगी आदित्यनाथांचा (Yogi Adityanath)उल्लेख केला आहे.त्यानंतर आता पुन्हा राज ठाकरे (Raj Thakre ) यांनी लहिलेल्या पात्रात योगीचा उल्लेख केला आहे .या पात्रात म्हटले आहे की उत्तरप्रदेशात ( Uttar Pradesh ) योगी सरकारने हि हजारो मशिदीवरील भोंगे उतरवले आहेत