स्थानिक स्वराज्य संस्थेंची निवडणूका अनेक महिन्यांपासून रखडल्या असून या निवडणुकांची तारीख पुढील काही महिन्यांत कधीही येऊन धडकणार असून या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांच्या कसरती आताच सुरु झाल्या आहेत. तसेच शिवसेना फुटल्या नंतर राज्यात अनेक समीकरणे देखील पाहायला मिळत आहेत. ती समीकरणे येत्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच होत आहेत. अश्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घोषणा केली आहे.
राज ठाकरे आज कोल्हापुर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत आगामी निवडणुकांच्या संधर्भात एक मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिकेची निवडणुक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. असे वृत्त ई-सकाळ वृत्तपत्राने दिले आहे.
मागील काही दिवसांपासून भाजप-शिंदे गट-मनसे हे समीकरण मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुळण्याची चिन्हे दिसत होती. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी ही युती होणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यांच्या भेटी-गाठीही वाढत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे एका मंचावर देखील अनेकदा आले होते. त्यामुळे महायुती होणार अशी जोरदार चर्चा होती.
मात्र राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार अशी घोषणा केल्याने महापालिका निवडणुकांत महायुतीच्या चर्चांना आता ब्रेक लागले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणुक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा राज ठाकरेनी केली आहे. ते आज कोल्हापुर दौऱ्यावर आहेत. यावेळा त्यांनी पत्रकार परिषद घेवून ही घोषणा केली. उद्या पासून राज ठाकरे कोकण दौऱ्याला जाणार आहेत. आज ते कोल्हापुरच्या दौऱ्यावर होते आजची त्यांचा दौरा पुर्ण झाला आहे.