नाशिक : नाशिकमध्ये भाजप-शिंदे गट यांच्यात तुझ माझ जमेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिंदे गट मंत्री दादा भुसे (minister Dada Bhuse ) यांना नाशिकच्या पालकमंत्री पदावरून (Guardian Minister post) हटवावे अशी मागणी एका भाजप नेत्याने थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. त्यामुळे इतक्या दिवसांपासून दाराआड असलेला वाद उफाळण्याची शक्यता आहे. मालेगावमधील भाजप नेते डॉ. अद्वय हिरे (BJP leader Dr. Advay Hire) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दादा भुसे यांना नाशिकच्या (Nashik District ) पालकमंत्रिपदावरून हटवावे अशी मागणी केली आहे.
नाशिक जिल्ह्यात मंत्री दादा भुसे हेच वर्चस्व गाजवू पाहत असून त्यांनी पालकमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर भाजपच्या आमदारांना (BJP MLA) तर डावलण्याचा प्रयत्न केलाच मात्र स्वपक्षीय नेत्यांना देखील त्यांनी डावलले असे त्यांचावर आरोप आहेत. सध्या जिल्ह्यात वर्चस्व गाजवण्यासाठीची चढा-ओढ सत्ताधारी नेत्यांकडूनच सुरु आहे. त्यात दादा भुसे हे आघाडीवर आहेत. बैठकांना भाजप आणि आपल्याच आमदारांना निमंत्रण न देणे असा नाराजीचा उघड सूर शिंदे गट आमदार सुहास कांदे यांनी लावला होता.
आता पुन्हा एकदा जिल्ह्यात शिंदे गट- भाजपमध्ये ठिणगी उडाल्याचे चित्र आहे. मालेगाव मधील बोरे आंबेदरी येथील पाण्याची चारी बंद करण्याचा निर्णय भुसे यांनी घेतला आहे. पालकमंत्री दादा भुसे हे ठेकेदारासाठी चारी बंद करून पाईपलाईनद्वारे पाणी पिण्याचा घाट घालत असल्याचा आरोप हिरे यांनी केला आहे.
शेतकरी आणि भाजप नेते भुसे यांच्या ह्या निर्णयामुळे कमालीचे संतप्त झाले आहेत. याच कारणावरू गेल्या २८ दिवसांपासून मालेगावात शेतकरी आंदोलन करत आहेत. बोरी-आंबेदरी बंदिस्त कालवा प्रकल्प (Bori-Ambedari Canal Project) रद्द व्हावा अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या मागणीला यश येत नसल्याने शेतकरी गणेश गंजीधर कचवे यांनी दादा भुसे यांना कारणीभूत धरत विष प्राशन केले (Ingested poison) आहे.
शेतकऱ्याने विष प्राशन केल्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात मालेगावातील शेतकरी तसेच भाजप नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या तसेच मालेगावमधील भाजप नेते डॉ. अद्वय हिरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दादा भुसे यांना नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून हटवावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे एकूणच शिंदे गट-भाजपमधील वादाची पहिली ठिणगी पडली आहे.